पुणे : चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यावरून पाटलांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने काढलेल्या मोर्च्यात बोलताना भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी खासदार सुप्रिया सुळेंवर तीव्र शब्दांत टीका केली होती.
'कशासाठी राजकारणात राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची असते? कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं? आता घरी जाण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही, तर तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या," असे म्हणाले होते. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला जात आहे. ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्या ऑफिसमधून वकिलांनी सुद्धा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार केली आहे. मुळचे कोल्हापूरचे असलेले आणि सध्या पुण्यातील कोथरूड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले भाजपचे श्री चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध असलेली आमच्या तक्रारीची गांभीर्याने दाखल घ्यावी अशी आमची विनंती असल्याचे त्यांनी पत्राद्वारे चाकणकर यांना कळवले आहे.
स्त्रिया घरातील कामाव्यतिरिक्त इतर कामासाठी उपयुक्त नाहीत
''दिनांक 25 मे 2022 रोजी मुंबई येथे करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी असंवेदनशील आणि स्त्रीत्वाचा अवमान करणारे विधान केले आहे. ते म्हणाले की “सुप्रिया सुळे यांनी घरी जाऊन स्वयंपाक केला पाहिजे त्या राजकारणात काय करता आहेत?” सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांचे काही वैयक्तिक राजकीय मतभेद अथवा नाराजी असली तरी त्यांनी केलेले विधान हे अत्यंत चुकीचे होते. हे विधान पुरुष वर्चस्ववादी विचार प्रक्रियेचा परिणाम आहे. अशा प्रकारच्या विचारांमुळे महिलांना घरातील कामे करणे, अन्न तयार करणे, भांडी स्वच्छ करणे इत्यादी पारंपारिक भूमिकांमध्ये बांधून ठेवले जातात. आणि इतर कुठल्याही गोष्टी करण्यावर बंधने घातले जातात. अशी विधाने पुरुषतत्ववादी दृष्टीकोन देखील दर्शवतात की स्त्रिया घरातील कामाव्यतिरिक्त इतर कामासाठी उपयुक्त नसल्याचे त्यांनी पत्रातून सांगितले आहे.''
मर्यादा सांगण्याऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या पुरुषांची गरज नाही
''भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत असलेले चंद्रकांत पाटील यांनी केलेले हे विधान सर्व वृत्तवाहीण्यावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये दाखवले जात आहे. आणि सर्व वृतापत्रामध्ये प्रसिद्ध होत आहे. पाटील यांनी केलेल्या निंदनीय वक्तव्याचा तीव्र निषेध केला पाहिजे. स्त्रीने काय करावे हे कोणत्याही स्त्रीला सांगण्याचा त्यांना अधिकार नाही. स्त्रीने काय केले पाहिजे याबद्दल त्यांचे विचार सामन्य आणि रूढीवादी आहेत. महिला राजकारणासह सर्वच क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहेत आणि त्यांच्या मर्यादा सांगण्याऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या पुरुषांची समाजाला गरज नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे.''
तक्रारीची गांभीर्याने दाखल घ्यावी
''महिलांचा आदर कसा करायचा हेच त्यांना माहित नसतांना असे तथाकतीत नेते त्यांच्या मतदार संघातील महिलांचे प्रतिनिधित्व कसे करतील? ते अश्या युगात आहे. जिथे महिला समान आहे हे लक्षात ठेवण्यासाठी त्यांना काही संवेदनशीलतेचे धडे देणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटना लिंगाच्या आधारावर भेदभाव न करण्याची हमी देते. परुंतु स्त्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने समाजात एक संदेश पसरवला जात आहे. की लिंगाच्या आधारावर महिलांमध्ये भेदभाव केला जाऊ शकतो. आणि महिलांनी केवळ घरातील कामे करणे चांगले आहे. भारतीय समाजातील स्त्रिया समानता मिळवण्यासाठी धडपडत आहे. आणि चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्यांमुळे महिलांच्या प्रतिष्ठेला शून्य पातळीवर नेऊन ठेवले आहे. म्हणूनच आम्ही चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तक्रार करत आहोत. आम्ही राज्य महिला आयोगाला विनंती करतो की त्यांनी महिलांबद्दल विधान करण्याबत राजकारण्यासाठी ‘एसओपी’ आणि ‘सिओसी’ तयार करावी. कोणतेही विधान करण्यापूर्वी संवेदनशीलता पाळावी. आम्ही राज्य महिला आयोगाला सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांमधील राजकारण्यांच्या महिला हक्कांच्या दृष्टीकोनातून एक संवेदनशीलता संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना करतो. मुळचे कोल्हापूरचे असलेले आणि सध्या पुण्यातील कोथरूड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध असलेली आमच्या तक्रारीची गांभीर्याने दाखल घ्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. ''