पुणे : समाज संवेदनाहीन होत असल्याची खंत ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला दोन वर्षे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन ४२ महिने होऊनही अद्याप तपास लागला नाही. याबाबत संताप व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी महर्षी वि. रा. शिंदे पुलावर जाऊन सोमवारी निषेध आंदोलन केले. मुक्ता दाभोलकर, मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे प्रा. शमशुद्दीन तांबोळी, मुक्तीवादी संघटनेचे शैलेश सावंत, कॉ. शांताताई रानडे, लता भिसे तसेच महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, सदस्य दीपक गिरमे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, शहराध्यक्ष माधव गांधी, चित्रलेखा जेम्स, अनीश पटवर्धन उपस्थित होते. मानवतावादी विचारवंतांना संपविण्याची धर्ममार्तंडांची भाषा अधिक धारदार होऊ पाहत आहे. मात्र कार्यकर्ते हा डाव हाणून पाडतील आणि तथाकथित विविध धर्ममार्तंडांवर वचक बसवतील, असे प्रा. शमशुद्दीन तांबोळी यांनी सांगितले. तर सरकारला खुनी आणि सूत्रधार शोधायचेच नाहीत असे संपलेल्या कालावधीतून स्पष्ट होते. (प्रतिनिधी)हत्येला झाले ४२ महिने पूर्ण४डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला साडेतीन वर्षे, कॉ. गोविंद पानसरेंच्या दोन वर्षे, तर प्रा. डॉ. कलबुर्गी यांच्या खुनाला दोन वर्षे पूर्ण झाली. या विचारवंतांच्या खून प्रकरणामध्ये आणि मडगाव बॉम्बस्फोटात संशयित म्हणून फरार असलेले सारंग अकोलकर, विनय पवार यांना पकडण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यांना त्वरित पकडण्याची मागणी मुक्ता दाभोलकर यांनी केली.
समाज संवेदनाहीन झालाय
By admin | Published: February 21, 2017 3:08 AM