शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

समाज विक्षिप्ततेकडे सरकतोय - भारत सासणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 2:30 AM

समाज विक्षिप्ततेकडे सरकत चालला आहे. ही विक्षिप्तता अस्वस्थ करणारी आणि भयावह आहे. समाजाला सातत्याने धक्के बसत आहेत, जीवनातील तणावामुळे मानसजन्य रोग दारावर येऊन ठेपले आहेत.

पुणे : समाज विक्षिप्ततेकडे सरकत चालला आहे. ही विक्षिप्तता अस्वस्थ करणारी आणि भयावह आहे. समाजाला सातत्याने धक्के बसत आहेत, जीवनातील तणावामुळे मानसजन्य रोग दारावर येऊन ठेपले आहेत. या पार्श्वभूमीवर कथा व्यक्तिजीवनाकडून समूहजीवनाकडे चालली आहे. लेखनावर वास्तववादाचे आक्रमण होत असताना मानवी जीवनाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांनी केले.दिलीपराज प्रकाशनाच्या वतीने प्रा. मिलिंद जोशी लिखित ‘खेळ’ या कथासंग्रहाचे प्रकाशन गुरुवारी सायंकाळी एस. एम. जोशी सभागृहात साहित्यिक राजन खान यांच्या हस्ते झाले. कथाकार भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास लेखक आणि संगीतकार आशुतोष जावडेकर, प्रकाशक राजीव बर्वे उपस्थित होते. या वेळी नाशिकमधील दि जिनियस या संस्थेच्या कलावंतांनी या निवडक कथांचे अभिवाचन केले.सासणे म्हणाले, ‘‘समाजाला निद्रस्त करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. सध्या माणूस अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जात आहे. बदलत्या काळात साहित्यात आव्हाने निर्माण झाली, तशी कथेची रूपेही बदलत गेली. कथेतून माणसाच्या आणि समाजाच्या व्यथांवर भाष्य केले जाते. मनोविश्लेषणात्मक आणि आस्थेवाईक कथांची, व्यक्तिजीवनाबद्दल बोलणाऱ्या कथांची निर्मिती व्हायला हवी. त्यातून लेखनाला वैश्विक उंची प्राप्त होऊ शकेल.’’प्रकाशक राजीव बर्वे यांनी प्रास्ताविक केले. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले. अनुज बर्वे यांनी आभार मानले.१ आशुतोष जावडेकर म्हणाले, मराठीसारखे वैविध्य, समृद्धी इतर कोणत्याही भाषेत नाही. मराठीत कमी प्रमाणात का असेना, कथांचे चित्र आशादायी आहे. मल्टिपल स्क्रीनच्या जमान्यात कथेतील गोष्ट मात्र हरवत चालली आहे. साहित्य हा साच्याविरोधात चाललेला अविरत संघर्ष आहे. कथासंग्रहात सुसूत्रता नसावी; मात्र, साचेबद्धपणा नसावा.२ मिलिंद जोशी म्हणाले, कथा ही कल्पना आणि वास्तवाचा खेळ असते. जीवनातील व्यामिश्रता लक्षात घेता, कथेच्या माध्यमातून ठरावीक कंगोºयातून जीवनाचे दर्शन घडवणे हे आव्हान असते. लेखक कथांमधून जीवनाचा अन्वयार्थ मांडतो. माणूस हा नात्यांच्या चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू असतो. दुभंगलेली मने, हरवलेला संवाद आणि विस्कटलेली नाती हे आजचे चित्र आहे. या परिस्थितीत नात्यातील अवकाश राखणे, आसक्ती अथवा विरक्तीकडे न जाता सुवर्णमध्य काढून नात्यातील संबंध दृढ करावा.कोणत्याही चौकटीत लिहिणारा, अथवा विशिष्ट पालखी वाहणारा लेखक असूच शकत नाही. चौकटीबाहेर विचार करणारा, वास्तव जोखणारा आणि व्यापक दृष्टीने पाहणारा खरा लेखक असतो. संवेदना जपणारा, आतमध्ये थोडे रडू जिवंत असलेला माणूसच लेखक होऊ शकतो. मराठी साहित्य जातीवाद, धर्मवाद, प्रदेशवादात अडकले असताना तटस्थ लिहिणारे, खुल्या अवकाशात वावरणारे लेखक वर्षानुवर्षे लक्षात राहतात.- राजन खान

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या