'सुसंगत फौंडेशन, पुणे या संस्थेच्या वतीने कोरोना योद्ध्यांना कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी जिल्हाधिकारी व साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख हे होते. कार्यक्रमामध्ये डॉक्टर, नर्स, पोलीस व अंत्यसंस्कार करणारे समाजसेवक आणि पत्रकार यांचा समावेश होता. या वेळी मंचावर सुसंगत फाउंडेशनचे अध्यक्ष सुधाकर न्हाळदे, श्रीपाद पंचपोर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वावरे, डॉ. अविनाश भोंडवे, महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे, अॅड वैशाली करे, सतीश खाडे आदी उपस्थित होते.
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, समाजाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहावे, मात्र ती लाट यशस्वी हाताळण्यासाठी प्रत्येकानेच जबाबदारीने वागले पाहिजे व आपल्याला कोरोना होणार नाही किंवा आपल्यामुळे इतरांना होणार नाही यासाठी सर्व काळजी घ्यावी. या वेळी सत्कारार्थींना स्मृतिचिन्ह, शाल डॉ. सु.भ, न्हाळदे लिखित 'चला जाऊ या सफरीला' हे पुस्तक देण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. सुनील धनगर यांनी केले. संगीता न्हाळदे यांनी आभार मानले.
--
फोटो क्रमांक : १९पुणे सुसंगत फाउंडेशन
फोटो ओळी : सुसंगत फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या कोरोना योद्ध्यांच्या गौरवप्रसंगी सुधाकर न्हाळदे, कृष्णकुमार गोयल, लक्ष्मीकांत देशमुख, उपायुक्त राजेंद्र मुठे आदी.