शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

सॉफ्टवेअर इंजिनिअरचा पार्किंग वादातून खून, कोंढव्यातील घटना : तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 6:54 AM

लुल्लानगरमधील बंगला नंबर ६७ समोरील सार्वजनिक रस्त्यावर शुक्रवारी रात्री आठ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पुणे/उंड्री : बंगल्यासमोर प्रवासी वाहतूक करणा-या गाड्या लावण्याच्या वादातून कोंढव्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरला लोखंडी गजाने मारहाण करून निर्घृण खून करण्यात आला. लुल्लानगरमधील बंगला नंबर ६७ समोरील सार्वजनिक रस्त्यावर शुक्रवारी रात्री आठ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.नेवल बोेमी बत्तीवाला (वय ३१, रा़ सहानी सुजान पार्क, लुल्लानगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे़ याप्रकरणी श्रीगणेश जयवंतराव रासकर (वय ३१), योगेश दिनू कडवे (वय २२, दोघे रा़ मोहिते टॉवर, सहानी सुजान पार्क, लुल्लानगर) आणि विक्रम लक्ष्मण भोंबे (वय ३२, रा़ रासकर पॅलेसमागे, चिंतामणीनगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़याप्रकरणी हवालदार मुन्नीर इनामदार यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रासकर, कडवे, भोंबे हे नेवल यांच्या बंगल्यासमोर प्रवासी वाहतूक करणा-या गाड्या लावायचे़ या कारणावरून यापूर्वी त्यांच्यात वाद झाले होते़ त्यांनी शुक्रवारी नेवल यांच्या बंगल्यासमोर गाडी लावली़त्यामुळे नेवल यांनी विचारणा केली़ तेव्हा त्यांनी प्रादेशिक परिवहन विभागात अधिकारी असल्याचे सांगितले़ त्यावर नेवल यांनी त्यांच्याकडे ओळखपत्र मागितले़ तेव्हा त्यांच्यात पुन्हा वाद झाला़ त्यानंतर तिघांनी नेवल यांना लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली व दगड फेकून मारला़ गंभीर जखमी झालेले नेवल हे खाली पडल्याचे पाहिल्यावर ते पळून गेले़ नेवल यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले़ उपचारादरम्यान पहाटे त्यांचा मृत्यू झाला़ पोलिसांनी तिघांना अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक ए़ एस़ सोनावणे अधिक तपास करीत आहेत़

टॅग्स :PuneपुणेMurderखून