शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

सोमेश्वर कारखान्याचा ऊस लागवड हंगाम जाहीर

By admin | Published: June 01, 2017 1:32 AM

येथील सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाने ऊस संशोधन केंद्र पाडेगाव व वसंतदादा साखर संस्था यांच्या सल्ल्यानुसार

लोकमत न्यूज नेटवर्कसोमेश्वरनगर : येथील सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाने ऊस संशोधन केंद्र पाडेगाव व वसंतदादा साखर संस्था यांच्या सल्ल्यानुसार सन २०१८-१९ या सालात गाळप होणाऱ्या उसाचा ऊस लागवड हंगाम जाहीर केला आहे. संचालक मंडळाची मासिक सभा २६ मे रोजी झाली. यामध्ये ठराव क्रमांक ६ नुसार पुढीलप्रमाणे ऊस जातीच्या लागवडींना परवानगी देण्यात आलेली आहे. आडसाली या हंगामात १ जुलै ते १४ आॅगस्ट या दरम्यान ऊस लागवड करायची आहे. यामध्ये को-८६०३२, कोएम ०२६५ व को व्हीएसआय ८००५ या उसाच्या जातींना परवानगी देण्यात आलेली आहे. पूर्व हंगामात १ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत को-८६०३२, कोएम-०२६५, को- व्हीएसआय ९८०५, कोसी ६७१, एमएस१०००१, को-९४०१२, तसेच सुरू या हंगामात १५ डिसेंबर ते २८ फे बु्रवारी या कालावधीत को-८६०३२, कोएम-०२६५, कोसी-६७१, व्हीएसआय ४३४, एमएस-१०००१, को-९४०१२ या उसाच्या जातींना परवानगी देण्यात आलेली आहे. खोडवा या हंगामात २८ फेब्रुवारीअखेर तुुटलेल्या उसाच्या खोडव्यामध्ये को-८६०३२, कोएम- ०२६५, को-व्हीएसआय ९८०५,८००५ कोसी ६७१, एमएस-१०००१, को-९४०१२ उसाचा खोडवा राखण्यासाठी संचालक मंडळाने परवानगी दिलेली आहे. हे करत असताना संचालक मंडळाने काही नियमही घालून दिलेले आहेत. यामध्ये लागण नोंद देते वेळी सातबारा व आठ अ देणे बंधनकारक राहणार आहे. एकाच वेळी जादा उसाची नोंद घेतली जाणार नाही. प्रतिएकरी १० टनांपेक्षा कमी ऊस असल्यास तो ऊस स्वत: कारखान्यावर तोडून आणावा. सभासदांनी दिलेली उसाची नोंद बोगस आढळल्यास ५०० रुपये ऊस बिलातून वसूल केले जाईल. जिरायती भागात लागण करणाऱ्या शेतकऱ्यांनी पूर्व हंगामी व सुरू हंगामात को- ८६०३२, को-व्हीएसआय८००५, कोसी ६७१, एमएस १०००१, को -४०१२ या उसाची लागवड करावी. उसाची नोंद देताना सातबारा देणे आवश्यक आहे. कारखान्याने ठरवून दिलेल्या तारखेपूर्वी उसाची लागण केल्यास, ती लागण तारीख १५ दिवस उशिरा धरण्यात येईल. आदी सूचना परिपत्रकामध्ये करण्यात आलेल्या आहेत.