इंदापूर : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे हक्काचे पाणी मिळते ते पाणी इंदापूर तालुक्यातील शेतकरी कधीही पळवणार नाहीत. परंतु ज्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्याचा हक्क नाही ते पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला मिळाले असताना, चुकीचा विरोध करून पाणी रोखले आहे व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संसारात विष कालण्याचे काम सोलापूरच्या काही स्वार्थी लोकांनी केले आहे. त्यांना उजनी धरणातून बेकायदेशीर एक पाण्याचा थेंबदेखील शेतकरी जाऊ देणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी दिला.
इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी इंदापूर-बारामती रस्त्यावर तरंगवाडी येथे काळ्या पट्ट्या बांधून रस्ता रोको करत सोलापूरच्या त्या लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे बोलत होते.
यावेळी लक्ष्मण झगडे, डॉ. दादाराम झगडे, विजय झगडे, तुकाराम अभंग, सचिन अभंग, नीरज झगडे, गणेश झगडे, तुकाराम करे, बजरंग राऊत, राजाराम तरंगे, माऊली शिंदे, गोखळीचे सरपंच बापू पोळ, उपसरपंच सचिन तरंगे, तरंगवाडीचे उपसरपंच अप्पा शिंदे, सरपंच कांतीलाल बुनगे, बापू पारेकर, शिवराज गावडे, आजिनाथ तरंगे, अण्णा शेंडगे, कांतीलाल तरंगे यांच्यासह शेतकरी या आंदोलनात सामील झाले होते. ___________________________________________________
फोटो ओळ : इंदापूर - बारामती रस्ता, झगडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी तरंगवाडी येथे रोखला.