पुणे : इयत्ता बारावीच्या निकालात पुणे विभागात सोलापुर विभाग अव्वल ठरला आहे. सोलापुरचा निकाल ९३.७४ टक्के लागला असून त्याखालोखाल ९२.२४ टक्के निकाल पुणे जिल्ह्याचा आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील ९१.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागात एकुण २ लाख ४० हजार ६९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २ लाख २२ हजार ६४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विभागामध्ये सर्वाधिक १ लाख ४ हजार ८४४ विद्यार्थी विज्ञान शाखेतील असून ९७.९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वात कमी निकाल कला शाखेचा असून ८३.१३ टक्के विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. वाणिज्य शाखेतील ९२.९३ टक्के तर व्यावसायिक शाखेतील ८८.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. शाखानिहाय निकालतही सोलापुर जिल्हा आघाडीवर राहिला आहे. विभागातील २७ हजार ९७४ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी तर ९५ हजार १२८ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील आहेत. -------------------पुणे विभागाचा निकालजिल्हा परीक्षा दिलेले उत्तीर्ण टक्केवारीपुणे १,२३,६५५ १,१४,०५६ ९२.२४अहमदनगर ६३,५१३ ५८,४१२ ९१.९७सोलापुर ५३,५२९ ५०,१७८ ९३.७४एकुण २४०६९७ २२२६४६ ९२.५०------------------------------------------------------विभागाचा शाखानिहाय निकालशाखा परीक्षा दिलेले उत्तीर्ण टक्केवारीविज्ञान १,०४,८४४ १,०२,६६० ९७.९२कला ६०,३८७ ५०,२०० ८३.१३वाणिज्य ६७,१९२ ६२,४४० ९२.९३व्यावसायिक ८,२७४ ७,३४६ ८८.७८----------------
बारावीच्या निकालात पुण्याला धोबीपछाड देत विभागात सोलापुर जिल्ह्याने मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 6:03 PM
पुणे विभागात एकुण २ लाख ४० हजार ६९७ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा त्यापैकी २ लाख २२ हजार ६४६ झाले उत्तीर्ण
ठळक मुद्देसोलापुरचा निकाल ९३.७४ टक्के असून त्याखालोखाल पुणे जिल्ह्याचा ९२.२४ टक्के