आळेफाटा : आळे (ता. जुन्नर) ग्रामपंचायत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित झाला असून, त्यातून खतनिर्मिती करण्यात येणार आहे.
आळे ग्रामपंचायतीने लवणवाडी येथे भाडेतत्वावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा घेतली आो. आळे, आळेफाटा, परिसरातील ओला व सुका कचरा जमा करून येथे आणला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथील ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा ग्रामपंचायतीचा मानस होता. आमदार अतुल बेनके यांनीही येथे भेट देत या घनकचरा प्रकल्पाची पाहणी केली. दरम्यान, स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, माजी सदस्य नेताजी डोके, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, शामराव माळी, सरपंच प्रीतम काळे, उपसरपंच विजय कुऱ्हाडे, आळे दूधसंस्था अध्यक्ष बापू गाढवे, ज्ञानराज पतसंस्था अध्यक्ष दिलीप वाव्हळ, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक ग्रामस्थ, कचरा प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक, कचरा प्रकल्पात काम करणारे कर्मचारी आदींच्या उपस्थितीत या घनकचरा प्रकल्पातील खतनिर्मिती करण्यास सुरुवात झाली.
चौकट
ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम गांभीर्याने हाती घेतली असून, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती संकल्पना आता प्रत्यक्षात आली आहे. नागरिकांनी याकरिता ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो : आळे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प.