शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
4
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
5
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
6
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
7
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
8
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
9
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
10
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
11
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
12
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
13
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
14
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
15
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
16
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
17
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
18
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
19
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
20
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य

Ajit Pawar: बॉलिवूड बाहेरच्या राज्यात घेऊन जाण्याचा काही लोकांचा प्रयत्न; पण बॉलिवूड कुठेच जाणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 16:53 IST

राज्यासह पुण्यातील आजपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे सुरु झाली आहेत. त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘तिसरी घंटा’ वाजवून नाट्यगृहाची नांदी झाली

ठळक मुद्देसरकार चालवत असताना हे बंद करा, ते बंद करा हे अजिबात आवडत नाही

पुणे : राज्यासह पुण्यातील आजपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे सुरु झाली आहेत. त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘तिसरी घंटा’ वाजवून नाट्यगृहाची नांदी झाली. यावेळी अजित पवार यांनी भाषणात बॉलिवूड बाहेर घेऊन जाणाऱ्या लोकांवर टीका केली आहे. बॉलिवूड बाहेरच्या राज्यात घेऊन जाण्याचा काही लोकांचा प्रयत्न असेल. तरी बॉलिवूड कुठेच जाणार नसल्याचे ते म्हणाले आहेत. 

''कोल्हापूरची चित्रपट नगरी आणि मुंबई फिल्म सिटी येथे नवीन चांगल्या सुविधा देऊ.  बॉलिवूड बाहेरच्या राज्यात घेऊन जायचा काही लोकांचा प्रयत्न सुरू आहे आहे.  तशा पद्धतीने काही राज्यांचे मुख्यमंत्री आले, तो त्यांचा अधिकार आहे त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. परंतु इथेच इतक्या चांगल्या सुविधा देऊ की बॉलिवूड कुठेच जाणार नाही....असे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले.''

सरकार चालवत असताना हे बंद करा, ते बंद करा हे अजिबात आवडत नाही

''सध्या सगळीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. परिस्थिती सुधारत आहे. पण, त्याला कुठे धक्का लागू नये, त्यातून आपल्याकडून काही चुका होऊन तिसरी लाट येऊ नये, ही खबरदारी आम्हाला घ्यावी लागते. सरकार चालवत असताना हे बंद करा, ते बंद करा हे अजिबात आवडत नाही.''

आता ही घंटा कितीदा वाजवायची कुणाला माहिती?

''आम्हाला देवळातली घंटा वाजवायची सवय म्हटल्यावर आता ही घंटा कितीदा वाजवायची हे कोणाला माहिती? अशी मिश्कील टिप्पणी अजित पवार यांनी केली आणि सभागृहात हशा पिकला.  नाटक बघता असताना घंटा वाजते तशीच घंटा वाजविण्याचा प्रयत्न मी सर्वांच्या साक्षीने केला...अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.'' 

कलावंतांना दिलेल्या ५ हजारात काही होणार नाही  

''कलाकार कल्याण मंडळ व्हावे, अशी मागणी होते आहे. हे सर्वकाही सुरळीत होऊ देत दिवाळीनंतर एकत्र बसून चर्चा करू. त्यातून सकारात्मक मार्ग काढण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. कलावंतांना ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  मला हेही माहित आहे की, ५ हजाराने काही होणार नाही. शेवटी सरकार म्हणजे सर्वसामान्य जे कर भरतात त्यातून जो पैसा येतो त्यातून सरकार चालते. त्यात कला पथकांना ५० ते ७० हजार रुपये देण्याचे अधिकार आम्ही जिल्हाधिका-यांना दिले आहेत.'' 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेartकलाcinemaसिनेमाBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिर