Ajit Pawar:'मेळाव्यात काहींची भाषणं नको इतकी लांबली, कुणाची लांबली ते...' अजित पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 09:35 AM2022-10-07T09:35:19+5:302022-10-07T09:35:25+5:30

भाषणानंतर बारकाईने विचार करून महाराष्ट्रातल्या जनतेने, मतदारांनी आणि विशेषता शिवसैनिकांनी निर्णय घ्यावा

Some people's speeches in the meeting were too long some were too long Ajit Pawar's comment | Ajit Pawar:'मेळाव्यात काहींची भाषणं नको इतकी लांबली, कुणाची लांबली ते...' अजित पवारांचा टोला

Ajit Pawar:'मेळाव्यात काहींची भाषणं नको इतकी लांबली, कुणाची लांबली ते...' अजित पवारांचा टोला

Next

बारामती : मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात काहींची भाषणं फारचं लाबंली. नको इतकी लांबली. आता कुणाची लांबली ते तुम्हीच विचार करा, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाला टोला लगावला. विरोधी पक्षनेते बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बारामती पत्रकारांशी संवाद साधला.

 पवार पुढे म्हणाले,  दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकायला मुंबईत यायचे, ही परंपरा आहे. पण दसरा मेळाव्यासाठी १० कोटी रुपये खर्च करून मेळाव्याला गर्दी जमा केली. यासाठी एसटी बससेचा उपयोग केला गेला. मात्र, अनेक एसटी बस दसरा मेळाव्यासाठी गेल्याने सर्वसामान्य प्रवाशांची अडचण झाली. त्यांच्यासाठी एसटी आहे. आणि कशा प्रकारे वापर झाला हे दिसल असल्याची टीका केली.

आता मतदारांनी विचार करावा 
 
मी दोघांची भाषणं ऐकली. पहिलं उद्धव ठाकरेंचं झालं आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंचं झालं. दोघांनी काय भाषणं केली हे सर्वांनी पाहिलं. यावर आम्ही जास्त टीका-टीपणी करण्याची गरज नाही. आता याबद्दल बारकाईने विचार करून महाराष्ट्रातल्या जनतेने, मतदारांनी आणि विशेषता शिवसैनिकांनी निर्णय घ्यायचा आहे. पुढे काय केलं पाहिजे,  भूमिका काय असली पाहिजे, कुणाच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे, कुणाची शिवसेना मूळ शिवसेना आहे, याचा विचार त्यांनी करावा असेही पवार यावेळी म्हणाले. 

 हा प्रकल्प गेल्याने दोन लाख तरुणांचा रोजगार गेला

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या कमीपणामुळे गेला. राज्यात जे सरकार आहे, त्याच विचाराचं सरकार केंद्रातही आहे. पण हा प्रकल्प गेल्याने दोन लाख तरुणांचा रोजगार गेला आहे. यातून तरुणांचा रोष हा आपल्यावर येईल, हे झाकण्यासाठी लपवण्यासाठी हे वक्तव्य केलं गेलं. विधानसभेतही मुख्यमंत्र्यांनी वेदांता प्रकल्प येतोय, हे भाषणात सांगितलं होतं. तुम्हीच आता टक्केवारीचा आरोप करताय. हे निरर्थक आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवावं, कोणी टक्केवारी मागितली ते. धादांत खोटं आहे, असं आव्हान  पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलं.झेंडा शिवसेनेचा आणि अजेंडा राष्ट्रवादीचा अस मी कधीहि ऐकलं नाहि. काल केलेली वक्तव्य राजकीय असल्यामुळे त्याला जास्त महत्व द्यायच नसते,असे  पवार म्हणाले.

Web Title: Some people's speeches in the meeting were too long some were too long Ajit Pawar's comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.