लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : कुणी पाण्याचे टँकर देता का रे..! अशी म्हणण्याची वेळ खेड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांवर आली आहे. १० दिवसांपूर्वी खेड पंचायती समितीमार्फत तालुक्यातील या गावांना टँकर मंजूर केले होते. मात्र संबंधित ठेकेदारांनी अद्याप ते सुरू केले नाहीत. तालुक्यात काही ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. २७ गावांतील ११६ वाड्यांवर भीषण पाणीटंचाई सुरू आहे. पंचायत समितीचे फक्त ४ टँकर सुरू आहेत. त्यामध्ये दोन पंचायत समितीचे, एक सेझचा व एक टेल्को कंपनीचा. याद्वारे वाडा, आव्हाट, कुरकुडी, वरुडे, चिंचबाईवाडी, कनेरसर या गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, अनेक गावातील वाड्यावस्त्या पाण्यापासून वंचित आहे. दररोज तालुक्यातील गावोगावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य खेड पंचायत समितीत येऊन आम्हाला पाणी द्या... अशी सभापती, गटविकास अधिकारी यांच्याकडे विनवणी करीत आहेत. १८ मे रोजी मे. अजितदादा मोटार वाहतूक सहकारी संस्था यांचेकडील पाच खासगी टँॅकर मंजूर करण्यात आले होते. मात्र, संबंधित संस्थेचा वारंवार पाठपुरावा करूनही ते टँकर खेड पंचायत समितीत दाखल झाले नाही. संबंंधित ठेकेदार सांगतात की, स्थानिक स्तरावर टँॅकर बघून टंचाईग्रस्त गावांना सुरू करा, तुम्हाला त्यांचे भाडे देतो. याबाबत १० दिवस उलटूनही मंजूर झालेले टँकर उपलब्ध झाल्याबद्दल जिल्हास्तरावर पत्रव्यवहार केला असल्याचे गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांनी सांगितले.निधीअभावी काम बंद तालुक्यात काही वाड्यावस्त्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पंचायत समितीमार्फत चार पाण्याचे टँकर सुरू आहेत. ते अपूर्ण पडत आहेत. पुणे येथील जिल्हा अधिकारी स्तरावर या कामांचे टेंडर निघते. १० दिवसांपूर्वी खेडसाठी टँॅकर मंजूर झाले होते, ते अद्याप आले नाहीत. याबाबत पत्रव्यवहार केला आहे.- इंदिरा अस्वार(गटविकास अधिकारी खेड)
कुणी पाण्याचे टँकर देता का रे.. टँकर !
By admin | Published: May 29, 2017 2:14 AM