शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

‘कोई लौटा दे मुझे बिते हुए दिन...’

By admin | Published: December 22, 2015 11:50 PM

आज मी जी काही आहे ती किशोरदांमुळेच. आयुष्यात खूपकाही मिळवलं तसं गमावलं देखील..ते जेव्हा मिळाले तेव्हा खूप काही गमावले होते..पण ते आयुष्यात

पुणे : आज मी जी काही आहे ती किशोरदांमुळेच. आयुष्यात खूपकाही मिळवलं तसं गमावलं देखील..ते जेव्हा मिळाले तेव्हा खूप काही गमावले होते..पण ते आयुष्यात आल्यानंतर जीवन कसे जगायचे ते शिकले अशी कृतज्ञ भावना व्यक्त करीत अभिनेत्री लीना चंदावरकर यांनी किशोरदांच्या आठवणींचा एकेक कप्पा उलगडत संपूर्ण आसमंत ‘किशोरमयी’ केला. ’त्यांचा’ चित्रपट कारकिर्दीचा काळ हा तसा 1969 ते 1979 इतकाच .पण या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या निरागस अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर ‘मन की बात’, ’हमजोली’, ‘मेहबूब की मेहंदी’, ‘बैराग’,’ आफत’, कैद’ ‘जुगनू’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले..एक उत्तम अभिनेत्री आणि प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांची पत्नी म्हणूनच नव्हे तर ‘गीतकार’ म्हणून देखील त्या नावारूपाला आल्या. लग्नानंतर चित्रपटांमधून ‘कमबँक’ करता आले नाही, कारण चांगल्या भूमिका वाट्यालाच नाहीत अशी प्रांजळ कबुली देत आजही चांगले रोल मिळाल्यास हिंदीमध्येच नव्हे तर मराठीमध्येही काम करण्याची इच्छा असल्याचे त्या सांगतात.वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी ’मन का मित’ या चित्रपटात काम करण्याची मिळालेली संधी ते सिद्धार्थ बांदोडकर यांच्याबरोबरचा विवाह, किशोर कुमार यांच्याशी झालेला दुसरा विवाह याबद्दल लीना चंदावरकर यांनी प्रथमच कोणताही आडपडदा न ठेवता मनमोकळा संवाद साधला. किशोरकुमार यांचा चौथा आणि आपला दुसरा विवाह कसा झाला याचा जणू आँर्खो देखा हाल त्यांनी कथन केला. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते खूश व्हायचे..’कोई लौटा दे मुझे बिते हुए दिन’ हे त्यांचे गाणे मला खूप आवडते...एरव्ही मरण्याचे नाटक करणारे किशोरदा जेव्हा १३ आॅक्टोबर १९८७ रोजी खरेच या जगातून निघून गेले. तेव्हा वाटले की हे एक दुस्वप्नच आहे. चिमटा काढला की आपण या स्वप्नातून बाहेर पडू. पण ते वास्तव होते. या प्रखर वास्तवात व किशोरदांच्या पश्चात जगण्याचे बळ त्यांनीच मला दिले, हे सांगताना त्यांचे डोळे नकळत पाणावले. संजय लीला भंसाळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ चे त्यांनी विशेष कौतुक केले. या दिग्दर्शकाने ब्लँक, गुजारिश, हम दिल चुके सनम सारखे खूप चांगले चित्रपट केले आहेत. कलात्मक आर्ट असलेल्या या चित्रपटांकडून रिटर्न मिळावे अशी निर्मात्यांची अपेक्षा आहे,