शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

खेळ कुणाला दैवाचा कळला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 1:07 AM

२४ वर्षांनंतर झीनत अम्मीला भेटते तेव्हा; मायलेकींचा घडला शब्दाविना ‘बोलका’ संवाद

- युगंधर ताजणेपुणे : इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात काय घडते हे गुगलला टिचकी मारण्याचा अवकाश की ते क्षणात समजते. हे जरी खरे असले, तरी सव्वा वर्षाची असताना स्पेनला गेलेल्या झीनत भारतात राहणाºया आपल्या अम्मीचा शोध घेते. प्रत्यक्षात तिची आणि अम्मीची तब्बल २४ वर्षांनंतर भेट होते. ऐकायला जरी हे नवल वाटत असले तरी अशावेळी दैवाचा खेळ किती अजब असू शकतो याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. जन्मदात्रीला भेटल्यानंतर भावना व्यक्त करण्यासाठी भाषा अडसर न ठरता केवळ नजर आणि स्पर्शाच्या माध्यमातून घडलेला त्या मायलेकींचा तो संवाद विलक्षण ‘बोलका’ होता.झीनतच्या आईच्या वाट्याला लग्न होण्यापूर्वीच मातृत्व आले. नात्यातीलच एकाने लग्नाच्या आणाभाका देऊन फसवले. दिवस गेलेल्या झीनतच्या अम्मीला काही करुन मुलीला जन्म द्यायचा होता. तिने धाडसाने निर्णय घेतला. मात्र पुढे परिस्थितीनुसार तिला मुलीकडे फारसे लक्ष देणे जमत नसल्याने तिने मुलीला शहरातील सोफोश या संस्थेत ठेवले. खरं तर तिला मुलीला स्वत:जवळ ठेवायचे होते. एवढेच नव्हे तर कुणाला दत्तक देण्याचा देखील तिचा विचार नव्हता. प्रत्यक्षात आज झीनतला ज्यावेळी बघितले त्यावेळी आपण काळजावर दगड ठेवून घेतलेला निर्णय बरोबर असल्याची भावना ती व्यक्त करते. स्पेनच्या अँटिच रमन आणि ग्रेसिया फोर्स या दाम्पत्याने तिला दत्तक घेतले. आईची एक इच्छा होती आपल्या मुलीचं नाव झीनत राहु देण्याची. ती त्यांनी मान्य करत ते एक वर्ष आणि चार महिन्याच्या झीनतला डिसेंबर १९९४ साली स्पेनला घेवून गेले. आता झीनत २४ वर्षांची असून तिचे स्पेनमधील नाव ‘मिराया’ असे आहे. तिने दोन्ही नाव तशीच ठेवली आहेत. आपल्या जन्मदात्या आईचा शोध घ्यावासा वाटला. काही करुन तिला भेटण्याची ओढ झीनतला स्वस्थ बसु देईना. तिचे पाय भारताकडे वळले. सोफोशच्या मदतीने तिच्या प्रयत्नांना यश आले. ज्यावेळी मायलेकींची पहिली भेट झाली. तेव्हा दोघींही बराच वेळ एकमेकींकडे बघत होत्या. अम्मी हिंदीत तर मुलगी इंग्रजी - स्पॅनिश भाषेत बोलायची. नंतर मात्र शब्दांची बंध गळुन पडला. अम्मीने झीनता चेह-यावरुन हात फिरवताच झीनतने तिच्या कुशीत शिरुन आपल्या अश्रुंना मोकळी वाट क रुन दिली.

टॅग्स :Puneपुणे