सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्याच्या चांगल्या कामात मिठाचा खडा टाकण्याचं काम विरोधकांकडून केले जात आहे. विरोधाला विरोध म्हणून भाजपने या निवडणुकीत पॅनेल उभे केले असल्याचे मत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले. जेऊर ता पुरंदर येथे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सभासद संपर्क दौऱ्यावेळी ते बोलत होते.
जगताप पुढे म्हणाले, कारखान्यावरील कर्ज फेड करत गेली पाच वर्षे चांगला दर दिला आहे. ३०६० च्या आधीच्या सरासरीने सोमेश्वरने दर दिला आहे. कारखान्याने कायम सभासदांचे सर्वांगीण हित जपण्याचा प्रयत्न केला आहे. कारखान्याच्या सभासदांना १३ हार्वेस्टर घेण्यासाठी प्रोत्साहन देत नवीन व्यवसाय निर्माण करून दिला आहे. तसेच कारखाना, विजप्रकल्प व डिस्टलरी विस्तारवाढ करत असताना दराची परंपरा कायम राहील असे आश्वासन जगताप यांनी दिले.
यावेळी विजयराव कोलते, शहाजी काकडे, माणिकराव झेंडे, दत्ता झुरंगे, दत्ताजी चव्हाण, उत्तम धुमाळ, बबुराव माहूरकर, विश्वास जगताप, शामराव धुमाळ, अनंत तांबे, राहुल तांबे, विजय धुमाळ, बाळासाहेब कामथे, माऊली धुमाळ, सोमनाथ तांबे, चंद्रकांत पिलाने, जनार्धन तांबे, पांडुरंग ठोंबरे, प्रकाश चोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.