शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

सोमेश्वरने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:32 AM

२ हजार ८०८ रूपये एफआरपी वर्ग करण्याचा निर्णय सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्याती ऊसदराची कोंडी फोडली ...

२ हजार ८०८ रूपये एफआरपी वर्ग करण्याचा निर्णय

सोमेश्वरनगर :

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्याती ऊसदराची कोंडी फोडली आहे. गाळप हंगाम सन २०२०-२०२१ करीता गाळपास आलेल्या संपुर्ण ऊसाची प्रतीटन २८०८ रुपये एकरकमी एफ.आर.पी सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

सध्या कोरोना, लॉकडाऊन अतिवृष्टी या ऐकापाठोपाठ आलेल्या अडचणीतून शेतकºयांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने दि.३०/११/२०२० पर्यंत गाळपास आलेल्या संपुर्ण ऊसाची एकरकमी एफ.आर.पी. सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. लवकरच ही रक्कम सभासदांना अदा केली जाईल. अडीअडचणीच्या प्रत्येक वेळी सभासद व कारखाना हे दोघेही एकमेकांसाठी उभे रहात असून ‘अभिमान याचा, सोमेश्वर माझा’ या उक्तीप्रमाणे आपली संस्था वाटचाल करीत असल्याचे गौरोउद्गार सभासदांमध्ये असून याचा आम्हा संचालक मंडळास सार्थ अभिमान असल्याचे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले. कारखान्याने आजअखेर २ लाख ८ हजार ३४५ मे. टन ऊसाचे गाळप केले असून संपूर्ण पुणे जिल्ह्यात क्रमांक एकचा १०.३० टक्के साखर ऊतारा मिळवीत २ लाख १० हजार ६०० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. तसेच कारखान्याच्या को-जनरेशन मधून १ कोटी ९० लाख ५८ हजार ३३९ युनिट्स विजनिर्मिती केली असून १ कोटी २७ लाख ३० हजार युनिट्स विज विक्री केली आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून सरासरी २७२,४२ ची रिकव्हरी मिळवत १४ लाख ९६ हजार ६०५ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले आहे. २ लाख ५५ हजार ९६ लिटर्स इथेनॉलची निर्मिती केलेली आहे. सोमेश्वर कारखान्याकडे ३३ हजार एकर ऊस क्षेत्राची नोंद झाली असून या गाळप हंगामात अंदाजे १२ लाख मे.टनाच्या आसपास गाळपासाठी ऊस उपलब्ध होण्याची शक्यता कारखान्याच्या शेतकी विभागाने वर्तविली आहे.

चौकट

कारखान्याकडे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यात येईल. कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता हंगामात ७५०० मे.टन प्रती दिनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबर कारखान्याने डिस्टीलरीचा वाढीव प्रकल्प हाती घेवून ज्यादा क्षमतेने इथेनॉल निर्मिती करुन सभासदांना अधिकचा मोबदला कसा देता येईल. याचाही संचालक मंडळ प्रयत्न करत आहे. गतवर्षीप्रमाणे आपणा सर्वांच्या सहकार्याने सुरु असणारा सन २०२०-२०२१ चा हा गाळप हंगामही आपण सर्वच बाबतीत यशस्वीरित्या पार पाडू.

- पुरूषोत्तम जगताप, अध्यक्ष सोमेश्वर कारखाना

———————————