सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १५ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होत आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
गेल्या एक वर्षापासून सोमेश्वरच्या निवडणुकीची प्रतीक्षा आहे. कोरोनामुळे ही प्रक्रिया लांबली होती. मात्र आज कारखान्याच्या निवडणूक कार्यक्रमावर शिक्कामोर्तब झाले. आज कारखान्याचे निवडणूक अधिकारी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आणि निवडणूक प्राधिकरण यांनी सोमेश्वर कारखान्याच्या निवडक कार्यक्रम जाहीर केला. तब्बल ३७ दिवसांचा हा निवडणूक कार्यक्रम राहणार आहे. यामुळे आता उद्या पासून इच्छुकांची मोर्चे बांधणीला सुरुवात होणार आहे. संचालक पदाची माळ आपल्याच गळ्यात कशी पडेल यासाठी जो तो आपापल्या परीने प्रयत्न करणार आहे.
दरम्यान, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी यापूर्वी सोमेश्वरची निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा पक्षाचा बऱ्यापैकी मार्ग सुकर होणार असला तरी निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवले तरी सर्वांना विचारात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निर्णय घ्यावा लागणार आहे.
दिलीप खैरे, माजी सभापती बाजार समिती पुणे-----------------सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व समविचारी आणि सर्व पक्षीय लोकांना एकत्र करून सभासदांच्या हितासाठी सोमेश्वर च्या निवडणुकीत पॅनल उभे करणार आहे. ——————————————————असा असेल निवडणूक कार्यक्रम १५ ते २२ फेब्रुवारी- अर्ज भरणे२३ फेब्रुवारी छाननी२४ फेब्रुवारी यादी प्रसिद्ध२४ फेब्रुवारी ते १० मार्च - अर्ज माघारी१२ मार्च अंतिम यादी प्रसिद्ध आणि चिन्ह वाटप२१ मार्च मतदान२३ मार्च मतमोजणी आणि निकाल——————————————————————असे असेल संचालक मंडळ गट १ निंबुत- खंडाळा ३ उमेदवारगट २ मुरूम - वाल्हा ३ उमेदवारगट ३ होळ-मोरगाव ३ उमेदवारगट ४ कोर्हाळे -सुपा ३ उमेदवारगट ५ मांडकी-जवळार्जुन ३ब वर्ग सभासद १ उमेदवारअनुसूचित जाती जमाती १महिला राखीव २इतर मागासवर्गीय १भटक्या विमुक्त जाती व जमाती १