पुणे- ''सोनिया गांधी आणि सुशीलकुमार शिंदे यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपानं केली आहे. काँग्रेसनं केलेल्या वक्तव्याचा फायदा पाकिस्तानने भारताच्या बदनामीसाठी करून घेतला आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपा प्रवक्ते संबीत पात्रा यांनी पुण्यात केली.शहर भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री असताना त्यांनी जयपूर येथे जाहीर व्यासपीठावर भारत हा हिंदू दहशतवादाचा अड्डा म्हटले होते. त्यावेळी व्यासपीठावर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित होते. त्यांनी याबाबत काहीही वक्तव्य केले नाही आणि याचा दाखला घेत काल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी युनायटेड नेशनमध्ये नेत भाजपाचा दाखला दिला. यामुळे भारताची बदनामी झाली. याबद्दल सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देशाची माफी मागायला हवी.
त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
- शरद पवारांना माझा सवाल आहे की, त्यांनी कलम 370 हटवण्यासाठी पाठिंबा का दिला नाही ?
- नोटबंदीच्या काळात देशात सर्वाधिक नक्षलवादी शरण आले. हा त्याचा फायदा आहे.
- ईडीच्या नावावर इव्हेंट डेव्हलपमेंट नाही झाल्या पाहिजे असा टोला त्यांनी नाव न घेता शरद पवारांना लगावला.