वडकी येथील गंगातारा वृद्धाश्रमामध्ये इंजिनिअर मराठी लेखक जितेंद्र वैद्य यांच्या ‘इंतुजींची खाबूगिरी’ आणि ‘भटजीगिरी’ या पुस्तकाच्या विक्रीतून मिळालेली १५ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. शिवसेना महिला आघाडीच्या सहसंपर्क संघटिका कीर्ती फाटक यांच्याकडे ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. याप्रसंगी सूर्यकांत वैद्य आणि बारती वैद्य, सविता मते, नगरसेविका संगीता ठोसर, सरोज कार्वेकर, मनीषा कुलकर्णी, गंगातारा वृद्धाश्रमाच्या संस्थापक अध्यक्षा नीता भोसले, ॲड. लक्ष्मी माने, साहेबराव भोसले, अनिकेत सोमण, प्रशांत ठोसर, संकेत मते, दीपक कामठे, अशोक बालगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोट
अमेरिकेतील अनिवासी भारतीय जितेंद्र वैद्य यांना आई-वडील कोरोनाबाधित असल्याचे समजताच त्यांनी तातडीने पुणे गाठले. मागील दोन महिन्यांपासून त्यांची सेवा केली. दोघेही कोरोनातून बाहेर आले आणि वडकीतील गंगातारा वृद्धाश्रमाला भेट देऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा निधी दिला.
- नीता भोसले, गंगातारा वृद्धाश्रम संस्थापिका
चौकट
जितेंद्र वैद्य अमेरिकेत राहतो. त्यांचा मुलगा अमेरिकत डॉक्टर आहे, पत्नीसुद्धा तेथील हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. मागील पाच वर्षांपासून तो आई-वडिलांना भेटलाच नव्हता. मात्र, आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच त्याने तातडीने पुणे गाठले. दोन महिने आई-वडिलांची सेवा करीत आहे. घरात भांडी घासणे, जेवण बनवणे, कपडे धुणे अशी सर्व कामे त्याने केली. आता आई-वडील दोघेही ठणठणीत बरे झाले असून, ते वृद्धाश्रमात कार्यक्रमासाठी आले होते. मात्र, दुसरीकडे ज्या मुलांनी आई-वडिलांना सोडून दिले, ते वृद्धाश्रमात पाहताना डोळ्यांच्या कडा पाणावल्या. जितेंद्र वैद्य शिकागोजवळच्या एका गावात राहतात. त्यांचा मुलगा अमेरिकेत सर्जन असून, कोविड रुग्णांची सेवा करीत आहे.
- ॲड. लक्ष्मी माने