शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

व्हिडीओ क्लिप बनविणाऱ्यांना सुगीचे दिवस

By admin | Published: February 17, 2017 4:26 AM

वाजंत्र्यांचा ताफा, त्यावर होणारा खर्च, त्याचबरोबर फ्लेक्स बोर्डवर जाहिराती करण्यास मर्यादा आल्याने जिल्हा परिषद

बारामती : वाजंत्र्यांचा ताफा, त्यावर होणारा खर्च, त्याचबरोबर फ्लेक्स बोर्डवर जाहिराती करण्यास मर्यादा आल्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत कमी खर्चात जादा परिणामकारक प्रचार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे आॅडिओ, व्हिडिओ व्हिज्युअलचे रेकॉर्डिंग करून देणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनाही या प्रकारच्या प्रचाराचा मोह आवरत नाही. त्यामुळे कमी मनुष्यबळात फक्त स्पीकर भोंग्यांद्वारे, पेनड्राइव्हद्वारे प्रचार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे उमेदवारांच्या खर्चातदेखील बचत होत आहे. या जिल्हा परिषद निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करण्यात कोणीही मागे पडलेले नाही. सध्या तरुणाईसह जवळपास सर्वांकडेच स्मार्टफोन आहेत. त्यामुळे फेसबुक लाईव्ह, व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ, व्हॉईस कॉलवर उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते भर देत आहेत. या निवडणुकीत सैराटच्या ‘झिंगाट’ गाण्यासह ‘बेबी ब्रिंगी डॉल’, तसेच ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या टायटल गाण्याला अधिक पसंती दिली जात आहे. फ्लेक्स लावण्यावर मर्यादा आल्या आहेत. तसेच त्यासाठी अनेक परवानग्या घ्यावा लागतात. त्यामुळे इंटरनेटच्या युगात ग्रामीण, शहरी भागातदेखील उमेदवारांना मोबाईलवर सहज उपलब्ध होता येत आहे. काही उमेदवार सोशल मीडियाच्या लाईव्ह सुविधेचा वापर करीत आहेत. त्यामुळे थेट मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य झालेले आहे. या संदर्भात येथील योद्धा प्रॉडक्शनचे नानासाहेब साळवे यांनी सांगितले, की पूर्वीसारखा माईकवर प्रचार करण्यापेक्षा नागरिकांच्या पसंतीला उतरलेल्या गाण्यांचा वापर करून प्रचार केला जातो. तसेच, ढोलताशा पथकाचादेखील समावेश केला जातो. आता केवळ एका पेनड्राइव्हमध्ये सर्वप्रकारचा प्रचार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे उमेदवारांनी प्रकाशकासह प्रसिद्ध केलेल्या पत्रकाचा वापर आॅडिओ, व्हिडीओ क्लिपसाठी आम्ही करतो. त्याचे ध्वनीक्षेपण करण्यासह इतर बाबींची परवानगी घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहते. (वार्ताहर)