दावडी (ता. खेड) येथे तालुका कृषी अधिकारी खेड व मंडळ कृषी अधिकारी खेड यांच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना नवीनकुमार गुंडाळ यांनी विविध योजनांची माहिती दिली. त्यामध्ये एमआरईजीएस अंतर्गत फळझाड लागवड व गांडूळ खत/नॅडेप युनिट उभारणी, महाडीबीटीवर विविध योजनांसाठी एकच अर्ज करणे तसेच हुमणी कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळे तयार करणे, गावाच्या जमीन सुपीकता निर्देशांकच्या शिफारशीनुसार रासायनिक खताचा वापर करताना १० टक्के कमी वापर करून त्या ठिकाणी सेंद्रिय खतांचा वापर करावा आणि शेतकऱ्यांनी देऊन फायदा घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
०३ दावडी
दावडी (ता. खेड) येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीजप्रक्रियाची माहिती देण्यात आली.