(स्टार ८४१ डमी)
पुणे : जिल्ह्यातील काही तालुक्यांत समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. काही तालुक्यात निम्म्याहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र, भात लागवडीसाठी अपेक्षित असलेला पाऊस अद्याप झाला नाही. त्यामुळे भात लागवड प्रत्यक्ष सुरू झाली नाही. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भात लागवड सुरू होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.
जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हवेली, पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर या तालुक्यांत प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, तूर, मूग, मका आदी पिके घेतली जातात. तर भोर, वेल्हा, मुळशी, मावळ तसेच खेड, आंबेगाव, जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यात भाताचे क्षेत्र मोठे आहे. मात्र, अद्यापही अपेक्षित पाऊस न पडल्याने भात लागवड सुरू झालेली नाही. जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भात लागवड सुरू होईल, असे कृषी खात्याचा अंदाज आहे.
--------
* पावसाची स्थिती (मि.मी.)
१) जिल्ह्यात किती अपेक्षित पाऊस होता?
:- १७६ मि. मी
२) जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस ?
:- १६६ मि.मी.
३) सर्वांत कमी पाऊस कोणत्या तालुक्यात झाला ?
:- इंदापूर ७९ मि.मी.
४) सर्वांत जास्त पाऊस कोणत्या तालुक्यात झाला?
:- वेल्हा ३८१ मि.मी.
-----
* कोठे किती पेरणी झाली (हेक्टरमध्ये)
१) अपेक्षित पेरणी क्षेत्र किती होते?
:- ३१४९०५
२) आतापर्यंत झालेली एकूण पेरणी?
:- २२०२२
-----
* तालुकानिहाय झालेला पाऊस (मि.मी.) आणि एकूण पेरणी (हेक्टरमध्ये)
तालुका पाऊस पेरणी
भोर २५१ १४६४३
वेल्हा ३८१ ५९९४
मुळशी २९३ ८७७२
मावळ ३२३ १२३११
हवेली १४२ ४९१२
खेड १७७ २३६२०
जुन्नर १०९ ३१२५५
आंबेगाव १७७ १८५८३
शिरूर १०३ २७४३३
पुरंदर १०३ १५५५०
बारामती ९९ १०२८१
दौंड १०८ ३१३७
इंदापूर ७९ ७७८३
-----------
* ...तर खते-बियाणे कसे मिळणार ?
कोट
१) तालुक्यात कृषी विभागाने खते आणि बियाणे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही.
- संपत बाजारे, शेतकरी, शिरूर
---
२) तालुक्यात पेरणी होईल एवढा पाऊस झाला आहे. त्यामुळे आमच्या येथील सर्वांनी पेरणी केली आहे.
- नरहरी इंगळे, शेतकरी, खेड
----
३) तालुक्यात अपेक्षित पाऊस पडला आहे. बियाणे मिळाले आहे. त्यामुळे खरिपाची पेरणी झाली आहे.
- संदीप पाठारे, शेतकरी, मावळ
------
* पीकनिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक अपेक्षित प्रत्यक्ष पेरणी
१) तूर १९२० ४४
२) ज्वारी ८०६ ०
३) बाजरी ३८७६१ २८३६
४) मका ३२४२ ०
५) भात ५७९६४ ०
६) मूग १३८०४ १९९१