वालचंदनगर :वालचंदनगर येथील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात गावठाण व गायरान क्षेत्र नसल्यामुळे शासकीय सुविधांपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. वालचंदनगर येथील शेती महामंडळाच्या शेतीमध्ये घरकुल बांधण्यास वालचंदनगर येथील नागरिकांना परवानगी द्यावी अशी मागणी वालचंदनगर ग्रामपंचायत सदस्य हर्षवर्धन गायकवाड यांनी पुणे जिल्हा परिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या ४० वर्षांपासून वालचंदनगर ग्रामपंचायतीला गावठाण क्षेत्र मिळावे यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या माध्यमातून आंदोलने मोर्चे काढण्यात आली. मात्र शासनाने त्याकडे डोळेझाक केली सध्या वालचंद नगर ग्रामपंचायतीला गावठाण क्षेत्र नसल्यामुळे घरकुल मंजूर झालेले लाभार्थी जागेअभावी घर बांधू शकत नसल्यामुळे लाभापासून वंचित राहू राहत आहेत. इंदापूर तालुक्यातील शेती महामंडळाच्या रत्नपुरी गळ्यावरील अनेक एकर क्षेत्र वालचंदनगर लगत पडीक स्वरूपात आहे. शेती महामंडळाने व शासनाने वालचंदनगर ग्रामपंचायतीला यामधील गावठाण क्षेत्र द्यावे म्हणजे या क्षेत्रात विविध शासकीय योजना राबवून घरकुल योजना यशस्वीपणे राबवली जाईल, असे निवेदनात सांगितले आहे. यावेळी पुणे जिल्हा परिषदेकडे व शेती महामंडळ कार्यालयाकडे निवेदन देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील उपस्थित होते.
वालचंदनगर येथील ग्रामपंचायतीला शेती महामंडळाचे क्षेत्र गावठाण क्षेत्र म्हणून मिळावे यासाठी ग्रामपंचायत सदस्य हर्षवर्धन गायकवाड यांनी पुणे जिल्हा परिषदेला निवेदन दिले.
०९०३२०२१-बारामती-०५
-------------------------------