पुणे : सॅक्ट्स रिहॅबिलिटेशन केअर फाउंडेशन एसआरपीएफ आयोजित विशेष मुलांसाठी रंग, कला, क्राफ्ट व डान्स स्पर्धेचे जांभुळकर चौक वानवडी येथे आयोजन करण्यात आले.मी स्वमग्न आहे; पण रंगांत रंगतो. मी स्पेशल आहे; तरी मलाही रंगकाम आवडते. मला सेरेब्रल पाल्सी आहे, तरीही मला क्रेयॉन धरायला आवडते. मला माहिती आहे मी रंगवू शकत नाही; पण रंगकला माझ्या चेहऱ्यावर हास्य आणील. आम्ही "हळू शिकणारे" आहोत; पण रंगकाम करताना आम्ही खूप आनंदात असू, असेच काहीसे भाव या कार्यक्रमातून विशेष मुलांच्या चेहऱ्यावर जाणवले.३ ते १५ वयोगटातील ४७ विद्यार्थी यात सहभागी झाले. सर्व मुलांना प्रशस्तिपत्रके, पदके व भेटवस्तू देण्यात आल्या. पारितोषिक वितरण डॉ. अर्चना कदम, भाजपा पर्वती मतदारसंघाचे सरचिटणीस दीपक शिरवळकर, धनंजय जगताप व फाउंडेशनचे अध्यक्ष देवाशीष भारती यांच्या हस्ते झाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. कमल माईटी, राधिका शहा, प्रीतम पाटील, राजेंद्र ठाकूर, शुभम पांडे, अक्षय गावसने, ज्ञानेश्वर नाटकर व संतोष खरात यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. पूजा चिंचोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)
विशेष मुलांनी दाखवली कला
By admin | Published: April 26, 2017 4:02 AM