पुणे: पुणे विभागातील पुणे-लोणावळा मार्गातील कामशेत-तळेगावदरम्यान पुलाच्या कामानिमित्त रविवारी (दि. ५) विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा पॉवर ब्लॉक सकाळी ११ ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे या वेळेत अप आणि डाउन मार्गावर ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यांना १५ ते ३० मिनिटांचा ब्लॉक देण्यात येणार आहे. हे ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी घेण्यात येत आहे. यात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
या गाड्यांना १५ ते ३० मिनिटांनी नियंत्रित केले जातील
- २२१५९ सीएसएमटी मुंबई-एमजीआर चेन्नई एक्स्प्रेस- १७२२ लोकमान्य टिळक-काकीनाडा एक्स्प्रेस- २२१९७ ग्वाल्हेर-दौंड एक्स्प्रेस- १२१६४ एमजीआर-चेन्नई-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस- १६३३२ तिरुवनंतपुरम-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस- २२९४३ दौंड-इंदौर एक्स्प्रेस
या मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत बदल
- ११०२९ सीएसएमटी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस सीएसएमटी मुंबईहून ८:४० ऐवजी ११:१० वाजता सुटेल.- १२४९३ मिरज-हजरत निजामुद्दीन मिरजहून ४:५० ऐवजी ८:२० वाजता सुटेल.
या लोकल गाड्या रद्द
- ०१५६४ पुणे-लोणावळा- ०१५६२ शिवाजीनगर-लोणावळा- ०१५६१ लोणावळा-पुणे- ०१५६३ लोणावळा-शिवाजीनगर- ०१५६६६ पुणे-लोणावळा