पुणे : भारती विद्यापीठ, न्यू लॉ कॉलेजच्या ‘सेंटर फॉर कम्युनिटी डेव्हलपमेंट’ (सीसीडील)च्या वतीने आणि ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरण’, ‘बहुजन हिताय’ आणि ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब’ यांच्या सहकार्याने ‘कायदेशीर हक्कांच्या जनजागृती’साठी कार्यक्रम झाला. ‘बहुजन हिताय’च्या प्रकल्प समन्वयक मालती वानखेडे, ‘विधी सेवा प्राधिकरणा’च्या अँड. प्रीती परांजपे, ‘सीसीडील’च्या समन्वयक प्रा. उज्ज्वला साखळकर आणि प्रा. डॉ. अनीसा शेख उपस्थित होत्या.
प्रा. साखळकर यांनी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ आणि त्याबाबतच्या कायदेशीर बाबी यासंदर्भात माहिती दिली. डॉ. शेख यांनी ‘हिंदू विवाह कायदा’ आणि घटस्फोटाच्या कायद्यांविषयी माहिती दिली. अॅड. परांजपे यांनी ‘कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायदा’ आणि त्याअंतर्गत संरक्षणासंदर्भात चर्चा केली. मनिषा बर्गे यांनी सूत्रसंचालन केले.