लोकमत न्यूज नेटवर्कचासकमान : चासकमान परिसरात मागील आठवड्यात वळवाच्या पावसाने हजेरी लावण्याने खरीप हंगामातील शेतीच्या कामाला वेग आला आहे.चासकमान परिसरात शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने पाऊस पडण्यापूर्वी शेतकरी हा खरीप हंगामाची शेतीची कामे करीत असतो. शेतकरी आपल्या शेतामध्ये सकाळी संध्याकाळी शेतीची कामे करू लागला आहे. शेतकरी आपल्या शेतात नांगरणी, पेरणी, भातलागवड आदींसह कामे करताना परिसरात दिसत आहेत. तर अनेक शेतकरी खरीप हंगामापूर्वी बाजरीचे केलेले पीक काढताना दिसत आहे.तसेच चासकमान परिसरात उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी शेतात बाजरीचे मोठ्या प्रमाणात घेतले होते. यामुळे खरीप हंगामापूर्वी बाजरीचे पीक निघत असल्याने परिसरात शेतकरी सर्वत्र बाजरीचे पीक काढणीला वेग आला आहे. मागील वर्षी पावसाळ्यात परिसरात शेतकऱ्यांनी बाजरीचे उत्पादन सर्वाधिक घेतले होते. परंतु खेड तालुक्याच्या पश्चिम सह्याद्रीच्या डोंगररांगांवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने बाजरीपिकाचे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु उन्हाळी हंगामात बाजरीचे पीक सर्वाधिक घेतले असल्यामुळे उन्हाळी हंगामात बाजरीचे उत्पादन सर्वाधिक होणार असल्याचे परिसरातील शेतकरी सांगत आहेत.मोहकल, कमान, परिसरात मागील आठवड्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात कमी अधिक प्रमाणात ओल निर्माण झाल्यामुळे शेतकरी आपल्या शेतात बैलांच्या साह्याने राजमाचे पिकाची पेरणी करु लागला आहे. कान्हेवाडी, कडधे, आखरवाडी, मिरजेवाडी, बिबी, घनवटवाडी आदी भागात पावसाळ्यात बटाटा पिकाचे अधिक उत्पादन घेतले जाणार आहे. बटाटा लागवडीसाठी शेतात शेणखत, कोबडीखत आदी खतांची मात्रा देण्यात येत असल्यामुळे शेतकरी खरीप हंगामापुर्वी आपल्या शेतात खत टाकणीची कामे करु लागला आहे. तर आपल्या शेतातील बांधावर अनेक प्रकाचे गवत तसेच काटेरी झाडे झुडपे तोडण्यात मग्न झालेला दिसत आहे.
खरीप हंगामाच्या कामाला वेग
By admin | Published: May 30, 2017 2:07 AM