टाकळी हाजी : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वामुळे शिरूर तालुक्यातील ३९ गावांतील रस्त्यांच्या कामासाठी भरीव निधी प्राप्त झाल्याने रस्त्यांच्या कामाला गती येणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केले.
जिल्हा परिषदमधून ३० लाख रुपये मंजूर झालेल्या म्हसे ते डोंगरगण या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात व बापूसाहेब गावडे विद्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, घोडगंगाचे संचालन राजेंद्र गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब भोर, मीना शाखा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रकाश वायसे, पुणे जिल्हा भष्ट्राचार व मानव अधिकार संघटनेचे अध्यक्ष दत्ता मुसळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सोनभाऊ मुसळे, ग्रामविकास अधिकारी राजेश खराडे, प्राचार्य आर. बी. गावडे, माजी उपसरपंच तुकाराम उचाळे, ग्रामपंचायत सदस्य काळुराम पवार, जयवंत मुसळे, बाळासाहेब मदगे, कोंडीभाऊ खाडे, शिवाजी चाटे, मुख्याध्यापक मिलन मिसाळ, अशोक गाडेकर, सुभाष चोरे, नवनाथ चोरे, संजय खाडे उपस्थित होते.
या वेळी भीमाशंकरचे संचालक प्रदीप वळसे पाटील म्हणाले की, गृहमंत्री वळसे पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली रस्ते, वीज, पूल, पाणी हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येत आहे . कोरोनाच्या संकटाशी सामना करीत जगावे लागणार आहे. या वेळी जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, राजेंद्र गावडे यांची भाषणे झाली.
प्रास्ताविक मीना शाखा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रकाश वायसे यांनी तर सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मुसळे यांनी केले. आभार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सोनभाऊ मुसळे यांनी मानले.
म्हसे ते डोंगरगण रस्त्याचे भूमिपूजन करताना माजी आमदार पोपटराव गावडे, प्रदीप वळसे पाटील, सुनीता गावडे, राजेंद्र गावडे व ग्रामस्थ.