शेटफळगढे : पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या टँकरवर ५ कोटी २ लाख रुपये खर्च झाला आहे. त्यामध्ये सर्वांत जास्त खर्च इंदापूर तालुक्यात म्हणजे १ कोटी ८० लाख रुपये खर्च झाला आहे. तर, मावळ तालुक्यात टँकरवर खर्च झालाच नाही. एप्रिल २०१५पासून जिल्हा परिषदेमधून खर्च झाल्याचे आकडे दिसत आहेत. इंदापूर तालुका सर्वच क्षेत्रांत पुढे आहे. कारण ऊस उत्पादनातही इंदापूर तालुक्याची आघाडी आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक साखर कारखाने, सर्वाधिक पाणीसाठा आसलेले उजनी धरणही याच तालुक्यात आहे. इंदापूर तालुक्यापाठोपाठ बारामती तालुक्यात १ कोटी २० लाख, पुरंदर ६० लाख, आंबेगाव ३० लाख, भोर आणि दौंड प्रत्येकी २० लाख, खेड २२ लाख, हवेली आणि शिरूर तालुक्यात प्रत्येकी १५ लाख, वेल्हा ८ लाख, मुळशी लाख आणि जुन्नर ५ लाख, असा आजपर्यंत जिल्ह्यात टँकरवर ५ कोटी खर्च झाला आहे. तर, सध्या सर्वाधिक ३२ टँकर बारामती तालुक्यात आहेत. त्यापाठोपाठ इंदापूर तालुक्यात २० टँकर, पुरंदर आणि दौंड प्रत्येकी १६ आणि जुन्नरमध्ये ५ टँकरने पाणीपुरवठा होतो. जिल्ह्यात ९० टँकरनी ५६ गावांत, ५४४ वाड्यावस्त्यांना शासकीय २२ आणि खासगी ६८ टँकरनी हा पाणीपुरवठा केला जातो, तर विहीर अधिग्रहणासाठी १५ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे.
जिल्ह्यात पाण्याच्या टँकरवर ५ कोटी खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2016 12:46 AM