काय साध्य होईल : अंदाज घेऊन पळणे लक्षात येईल.
सज्जतेसाठी घोषणा : माणसा माणसा जागा हो, देशाचा एक धागा हो
खेळ खेळायचा कसा :
असलेल्या खेळाडूंचे दोन समान संख्येचे गट करून घ्यावेत. एका गटाला पुन्हा त्यांच्यात दोन गट करून गोलावर समान अंतरावर एकमेकांच्याकडे तोंड करून उभे राहण्यास सांगावे व दोघांच्यामध्ये अंतर ठेवून दोन्ही हात वर पकडावेत हे झाले कोळ्याचे जाळे. नंतर दुसऱ्या गटातील खेळाडूंना सांगावे पळा पळा. (जे गोलावरून पळतील ते झाले मासे) पळत असताना वरील घोषणा द्यावी. तसेच मासे दोघांच्या जोडीमधून पळतील व मासेही घोषणा देतील. नंतर शिक्षक 'जाळ्यात मासा पकडा' असे म्हणताच ते मासे जोडीच्या हातात सापडतील ते बाद. अशा पद्धतीने हा खेळ अदलाबदल करून म्हणजे माशांचे कोळी व कोळ्यांचे मासे असा बदल करून खेळता येईल.