माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले सायकलिंग :
५८ बेलांच्या रोपांची केली लागवड
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सायकलिंग : ५८ बेलांच्या रोपांची केली लागवड
इंदापूर : राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त भिगवण सायकल क्लब, इंदापूर सायकल क्लब आणि कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने फिट इंडिया व सेव्ह नेचर या उपक्रमांतर्गत अयोजित केलेल्या सायकल राईडमध्ये, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही सायकल राईड करत सायकल क्लबला प्रतिसाद दिला.
शनिवार (दि. २८ ऑगस्ट) रोजी १५० पेक्षा जास्त सायकलप्रेमींनी भिगवण - इंदापूर - भिगवण सायकल राईडच्या माध्यमातून ५८ किलोमीटर सायकलिंग करून इंदापूर महाविद्यालयातील ऑक्सिजन पार्कमध्ये ५८ बेलाच्या रोपांचे वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. तसेच पाटील यांच्या जन्मदिनानिमित्ताने ५ हजार ८०० बेल व देशी रोपांचे कॉलेजने वाटप केले.
भिगवन सायकल क्लबचे अध्यक्ष रणजीत भोंगळे, माजी रोटरी अध्यक्ष रियाज शेख, इंदापूर सायकल क्लबचे अध्यक्ष सुनील मोहिते, गौरी सातारले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, माजी नगरसेवक शेखर पाटील, हर्षवर्धन पाटील मोटार वाहतूक संघाचे चेअरमन रघुनाथ राऊत, भिगवन सायकल क्लबचे उपाध्यक्ष अर्जुन तोडकर, सचिव अल्ताफ शेख तसेच केशव भापकर, रियाज शेख, संजय चौधरी, अनिल काळे, संजय खाडे, दिनेश मारणे, अवधूत पाटील, प्रवीण वाघ उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले. सूत्रसंचालन संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी केले. डॉ. शिवाजी वीर यांनी आभार मानले.
---
फोटो क्रमांक : २८ इंदापूर सायकल रॅली
फोटो ओळ : भिगवण इंदापूर सायकल राईडमध्ये सहभागी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व मान्यवर
------