--
दौंड: लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने दौंड येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एका दिवसात तब्बल १२६ बाटल्या रक्त संकलित झाले. रक्तदानासाठी शहरात दोन ठिकाणी उभारण्यात आलेल्या केंद्रामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. विशेष म्हणजे राज्य राखीव पोलीस बल गट क्र.७ च्या अष्टविनायक मंगल कार्यालयात पोलीस जवानांच्या रांगा लागल्या होत्या.
लोकमत, रोटरी क्लब ऑफ दौंड, रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड, कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. ॲशवडू मेमोरियल हॉलमध्ये झालेल्या उत्स्फूर्तपणे रक्तदान झाले. तेथे विशेषत: दौंड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ आणि ७ चे जवान, रोटरी, रोटरॅक्टचे सदस्य आदींनी मोठा प्रतिसाद दिला.
शिबिराचे उद्घाटन राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ चे समादेशक श्रीकांत पाठक, राज्य राखीव बल गट क्र . ५ चे समादेशक तानाजी चिखले, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा शालिनी पवार, सचिव पायल भंडारी, रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षा पूजा बिडगर, सचिव हेमांगी बंब, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ चे पोलीस निरीक्षक सचिन डहाळे, गट क्र पाचचे पोलीस निरीक्षक संजय भोसले, संदीप इथापे, रोटरी आणि रोटरॅक्ट क्लबचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच रोटरी ब्लड बँकेचे रवींद्र फडतरे, नारायण पाटील, संजय शिंदे, रिजवान मुलाणी, वृत्तपत्रविक्रेते बाबू म्हेत्रे आदी उपस्थित होते.
शिबिरासाठी दौंड रोटरी ब्लड बँकेचे सहकार्य मिळाले.
कार्यक्रमाच्या सांगताप्रसंगी लोकमतच्या वतीने रोटरी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, तर रोटरी क्लबच्या वतीने लोकमत पुणे आवृत्तीचे महाव्यवस्थापक मिलन दर्डा उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रफुल्ल भंडारी यांनी केले.
--
पती पत्नीचे रक्तदान
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ चे जवान प्रवीण धुर्वे, त्यांच्या पत्नी वर्षा धुर्वे यांनी पाऊस सुरू असताना देखील भर पावसात शहरातील रक्तदान केंद्र गाठून या दांपत्यांनी एकाच वेळेस रक्तदान केले.
--
दगडे यांचे ७० वे रक्तदान
खोरवडी (ता. दौंड) येथील बाबूराव दगडे या व्यक्तीने या शिबिरात रक्तदान केले, त्यांचे हे सत्तरावे रक्तदान होते. केवळ सामाजिक बांधिलकीतून वेळोवेळी रक्तदान केले असल्याचे बाबूराव दगडे म्हणाले.
--
शिबीराला नेत्यांच्या भेटी
पुणे जिल्हा मध्यवार्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, माजी नगरसेवक प्रवीण परदेशी, राष्टवादी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष दिपक सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मिसाळ, पाटस येथील ग्रामविकास फाउंडेशनचे हर्षद बंदीष्टी यांच्यासह विविध क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते व सामान्य नागरिकांनी भेटी दिल्या.
--
फोटो क्रमांक १ : ०९दौंड रक्तदान शिबीर श्रीकांत पाठक
फोटो ओळी : दौंड येथे रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी समादेशक श्रीकांत पाठक, समादेशक तानाजी चिखले यांचा सत्कार करण्यात आला.
-
फोटो क्रमांक २ : ०९दौंड रक्तदान शिबीर पोलिस जवान
फोटो ओळी : दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र.७ येथे रक्तदानासाठी पोलीस जवानांच्या लागलेल्या रांगा
--
फोटो क्रमांक ३: ०९दौंड रक्तदान शिबीर पोलिस निरिक्षक नारायाण पवार
फोटो ओळी : दौंड शहर पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी रक्तदान केले यावेळी उपस्थित पोलीस निरिक्षक नारायण पवार