आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून तालुक्यामध्ये १२ उपकेंद्रांमध्ये गुरुवारपासून कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. या माध्यमातून खळद येथे लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्या सुनिता कोलते, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर डांगे, सरपंच कैलास कामथे, बबनराव कामथे, चंद्रकांत कामथे, नाना खळदकर,गणेश खळदकर,संजय कामथे,सुरेश रासकर,सदस्य योगेश कामथे,शारदा कामथे,नम्रता कादबाने,आरती आबनावे,सुरेश जगताप, बाळा कादबाने,वृषाली कादबाने ,नंदकुमार रासकर उपस्थित होते.
बेलसर आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी जाताना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते या पार्श्वभूमीवर जास्त केंद्र वाढविण्यात आली असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन झुरंगे यांनी केले तर खळद येथे लसीकरण उपक्रमात गावातील सर्व नागरिकांच्या पर्यंत ही लस पोहोचव ण्यासाठी प्रयत्न केला जाईल तर परिसरातील कुंभारवळण, एखतपुर, मुंजवडी, खानवडी, वाळुंज, शिवरी गावातील नागरिकांनीही या उपक्रमाचा फायदा घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य योगेश कामथे यांनी यावेळी केले.
आवश्यकतेनुसार लसीचा पुरवठा केला जाईल ,लस कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ,मात्र गावातील व परिसरातील सर्व नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा. असे आवाहन बेलसर प्रथमोपचार केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भरत शितोळे यांनी केले आहे.
०१जेजुरी खळद
खळद येथे कोरोना लसीकरण शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवर.