वय वर्ष ६० वरील व्यक्तींना आणि ४५ ते ६० वय असलेल्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना कोरोना लस देण्यात येत आहे. मागील आठवड्यात १३० तर आज दिवसभरात ९९ व्यक्तींना लसीकरण करत एकुण २२९ जेष्ठांना लसीकरण केले गेले.
नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मागील काही दिवसांत परिसरातील गावातील ज्येष्ठ, शिक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. पुढील आठवड्यात एक हजारच्या दरम्यान व्यक्तींना कोरोना लस देण्यात येणार आहे. सरकारकडून आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार कोरोना लसीचे सत्र आयोजित केले आहे.
ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे दुसरा डोस सोमवार ते शनिवार दिला जाणार आहे. .मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार लसीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार दुसरा डोससाठीचे लसीकरण ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे होणार आहे. त्याचबरोबर पहिल्या डोससाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर, परिंचे, माळशिरस, वाल्हा, नीरा याठिकाणी सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार या दिवशी लसीकरणाचे सत्र उपलब्ध राहील. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वाढत्या कोरोना रोगाचा संसर्ग पाहता आरोग्य केंद्रावर गर्दी न करता संयमाने लस घ्यावी. लसी बद्दल कुठलेही गैरसमज पसरू नयेत असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य धारुरकर यांच्याकडुन करण्यात येत आहे. नीरा प्राथमीक आरोग्य केंद्रात शुक्रवारी आरोग्यसेवीका अनिता नेवसे व शुभांगी चव्हाण यांनी लस दिली.आँनलाईन तपासणी आशा सुपर्वायझर शुभांगी रोकडे, संगम कर्वे यांनी केली. आशासेवीका स्वाती गायकवाड, मनिषा निगडे, शाहिण बागवान, निषा पवार, लता पवार यांनी नोंदी घेतल्या. निरिक्षण कक्षात शिवाजी पवार, सचिन ननवरे व सचिन गायकवाड यांनी काम केले तर सुपरवायझर आरोग्यसहायक बेबी तांबे होत्या.
नीरा (ता.पुरंदर) लसीकरण करताना आरोग्यसेवीका अनिता नेवसे व सहकारी.