आज दुसरा प्रयोग : महिलांच्या संवेदनशील विषयावर भाष्य
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लैैंगितकेशी संबंधित अनेक नाजूक विषयांवर आजही खुलेपणाने बोलले जात नाही. अशाच नाजूक मात्र महत्वाच्या विषयावर ‘त्या चार योनींची गोष्ट’ या नाटकातून भाष्य करण्यात आले आहे. प्रा. नितीन कुमार यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या नाटकाचा प्रयोग लॉकडाऊननंतर पहिल्यांदा शनिवारी (१६ जानेवारी) सायंकाळी ६ वाजता पार पडला. प्रेक्षकांचा या प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी, १७ जानेवारी रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सायंकाळी ६ वाजता दुसरा प्रयोग होणार आहे.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रियांच्या काही गरजा, अपेक्षा वेळच्या वेळी पूर्ण होणे गरजेचे असते. स्त्रियांशी निगडित संवेदनशील विषयावर या नाटकाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा या शहरात नाटकाचे प्रयोग झाले आहेत. नाटकाची निर्मिती प्रा. नितीन कुमार आणि मंदार बापट यांची आहे, संगीत अभिजीत इनामदार यांनी दिले आहे. डॉ. सोनाली घाटणेकर, शुभांगी शेट्ये, अमृता उत्तरवार, शिल्पा मधले, मानसी भावे, संपदा देवधर यांनी नाटकात भूमिका साकारल्या आहेत