दुसऱ्या डोसकरिता ८४ दिवसांची मुदत असल्याने औंध रुग्णालयमध्ये गर्दी कमी होती तर शेवाळे हॉस्पिटलमध्ये तुरळक नागरिक दिसत होते. कोटबागी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांकरिता ५५ बेड आहेत, एकूण २२ रुग्ण उपचार घेत असून त्यातील १० जणांना ऑक्सिजन लावल्याची माहिती डॉ. प्रसाद कस्तुरे यांनी दिली. मागील महिन्यात ४८ बेडवर रुग्ण होते. आता ती संख्या २२ वर आलेली आहे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत असल्याचे त्यांनी सांगितले.
औंध आयटीआय कोरोना विलगीकरण कक्षात १५० पेशंटकरिता खाटा असून आता ३० पेशंट आहेत.
मागील महिन्यात ही संख्या ८० पर्यंत होती ती आता कमी कमी होत आहे. पेशंटची येथे दिवसातून तीन वेळा तपासणी केली जाते. येथे प्राणायाम करायला शिकविले जाते. ८ ते १० दिवस पेशंटला ठेवून सोडले जाते, अशी माहिती यावेळी बोलताना डॉ. नीता चिटणीस यांनी दिली.