युवा विकास मंच गेल्या तीन वर्षांपासून प्रायव्हेट रोड भागातील लहान मुलांना मोफत व्यावसायिक, स्पर्धात्मक स्वरूपातील बॉक्सिंग व फुटबॉल खेळाचे मोफत प्रशिक्षण देत असून, युवा मंचमार्फत खेळाडूंना उच्च दर्जाचे मोफत येथील नामवंत व राष्ट्रीय खेळाडूंमार्फत प्रशिक्षणासोबत खेळाचे संपूर्ण साहित्य , किट, गणवेश आदी वस्तू दिल्या जातात या संस्थेतील खेळाडू आजपर्यंत राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवरील खेळांमध्ये प्राविण्य मिळवले आहे. याबाबत युवा विकास मंचाचे संस्थापक सचिन शिंदे म्हणाले झोपडपट्टी भागातील अनेक गुणी खेळाडू आहेत ज्यांना योग्य वयात खेळाच सवय लागणे अत्यंत गरजेचे असल्याने आम्ही आमच्या भगत मोफत प्रशिक्षण व मोफत क्रीडा साहित्य, गणवेश आदी गोष्टी चा मोफत पुरवठा करतो करण विद्यार्थी गरीब असून त्यांच्या प्रतिभा आहे, ही प्रतिभा जपणे हे माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे.
फौंडेशनचे भारत जगताप म्हणाले, की दीड महिण्यागोदार आम्ही प्रशिक्षण चालत आसलेल्या ठिकाणी भेट दिली व त्यासाठी लागणाऱ्या साहित्य आज आम्ही त्यांना देत आहोत. आमचीगरीब परिस्थिती आहे. लहान वयात माझा मुलगा खेळत एवढा प्राविण्य मिळवू शकला याचे श्रेय युवा विकास संस्थेला आहे बॉक्सिंग खेळाडूचे वडील यांनी सांगितले.
कार्यक्रमाला एकयानचे सिध्दार्थ गायकवाड, ॲड. महेश काकडे, प्रमोद कदम, सतीश मापरे उपस्थित होते, तर श्रीकांत जगता यांनी सूत्रसंचालन तर रमेश गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन मंचाच्या वतीने सुनील गायकवाड, अजय भलशांकर आदींनी केलं होते.