पुणे : महापालिका निवडणूक प्रचारात काही प्रभागांमध्ये वेगवेगळ्या राजकीय उलाढाली सुरू आहेत. अपक्षांना हाताशी धरून काही राजकीय पक्षांचे उमेदवार अशा खेळ्या करीत असून, नागरिकांमध्ये त्याची चर्चा आहे. पिछाडीवर असलेले एखादे बंडखोरांचे पॅनल अचानक जोरात प्रचार करू लागणे किंवा काही अपक्षांनी एखाद्या पक्षाच्या प्रचारसभेत आपला पाठिंबा जाहीर करणे असे प्रकार होत आहेत. राजकीय गणिते लढवून केल्या जाणाऱ्या या खेळ्यांमध्ये पैशांचीही मोठी उलाढाल असल्याचे बोलले जात आहे.शहराच्या मध्यवस्तीतील एका प्रभागामधील लढत ऐनवेळचे पक्षांतर, चिन्हांची अदलाबदल, मारामारी अशा विविध कारणांनी वादग्रस्त झाली आहे. या प्रभागात वेगवेगळ्या दोन राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. आता त्यांनी एकत्र येत या प्रभागात पॅनल तयार केले आहे. त्यांना प्रतिस्पर्धी राजकीय पक्षानेच फूस दिली असल्याची चर्चा आहे. हे बंडखोर त्या त्या पक्षाची मते घेतील व त्याचा फायदा आपल्याला होईल, असा होरा लढवून ही खेळी केली असल्याचे खासगीत सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)४शहराच्या पूर्वभागातील एका पक्षाच्या प्रचारसभेत अचानक त्या प्रभागातील दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेत पक्षाच्या उमेदवाराला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यंत्रावर नाव असले तरी आपण प्रचार करणार नाही, आपल्या समर्थकांनी संबंधित पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यामागे अर्ज दाखल केला तेव्हापासूनच्या खर्चाचा हिशोब करून तो उमेदवाराकडून वसूल केला असल्याची चर्चा आहे.४काही ठिकाणी मला एक मत द्या, बाकीची मते दुसऱ्या पॅनलमधील तुमच्या आवडत्या उमेदवाराला दिली तरी चालतील, असाही प्रचार खासगीत सुरू असल्याचे दिसते आहे. एकाच पक्षातून उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे दोन मित्रांनी वेगवेगळ्या पक्षांतून उमेदवारी करीत प्रचाराचा असा अभिनव मार्ग अवलंबला आहे. त्यांच्या पॅनलमधील अन्य उमेदवार मात्र त्यांच्यावर विसंबून आहेत.
प्रचारपटावर पेच-डावपेच
By admin | Published: February 18, 2017 3:46 AM