पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी (दि. २) दुपारी ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर हाेणार आहे. दुपारी १ वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, काेल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व काेकण या ९ विभागीय मंडळातील २०,०१० शाळांमधील १५,७७,२५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती. त्यामध्ये ८,४४,११६ मुले आणि ७,३३,०६७ मुलींचा समावेश हाेता.विद्यार्थ्यांच्या निकालाबराेबर इतर सांख्यिकीय माहिती येथे मिळणारwww.mahresult.nic.in शाळांना एकत्रित निकाल www.mahahsscboard.in विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत दि. १४ जून राेजी दुपारी ३ नंतर गुणपत्रिका वितरित करण्यात येईल. अनुराधा ओक,सचिव, राज्य मंडळ येथे पाहता येईल निकालwww.mahresult.nic.insscresult.mkcl.orgssc.mahresults.org.in