घोडेगाव : भीमाशंकर कडून कल्याण कडे निघालेल्या एसटी बसला गिरवली ता. आंबेगाव गावाजवळ अपघात झाला. यात प्रवास करत असलेले 35 प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर घोडेगाव ग्रामीरुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या उत्तर भारतीयांचा श्रावण सुरू असल्याने या बस मध्ये मुंबईमधील अनेक उत्तर भारतीय भाविक होते.
घोडेगाव वरून जुन्नर कडे जाणारा रस्त्यावर असलेल्या गिरवली गावच्या पुढे अवघड वळणावर एसटी घसरली व गाडी कठडे तोडून पुलाच्या खाली गेली. नुकताच पाऊस झाला असल्याने रस्ता निसरडा झाला होता. त्यामूळे हा अपघात झाला असावा असा अंदाज प्रत्यक्ष दर्शनी व्यक्त केला आहे. यामध्ये जखमी झालेल्या 35 प्रवाशांना घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, गिरवली गावचे सरपंच संतोष सैद व ग्रामस्थांनी खाजगी वाहने, रुग्णवाहिका यामध्ये घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात पोहचवले. या सर्व ३५ जखमींवर घोडेगाव ग्रामीन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत अनेकांना किरकोळ मार लागला आहे.