भोर : एसटी चालकाचा गाडीवरील ताबा सुटुन भोर कापुरव्होळ रस्त्यावरील सांगवी गावाजवळ एसटी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत.त्यातील दोनजण गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर एसटी बसच्या पुढील व मागिल काचा फोडुन इतर प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला ही घटना गुरुवारी सकाळी १०.२० वाजता घडली. अपघातानंतर गाडीचा चालक फरार झाला आहे. एसटी अपघातात सुमन खोपडे (वय ६० रा. भोलावडे ता भोर),मुक्ताबाई गणपत भिलारे (वय ७० रा .वरोडी ता.भोर) नवनाथ शंकर काटकर (वय ३४ रा हारतळी ता खंडाळा) ,मारुती लक्ष्मण बागल (वय ५५ रा. नाझरे ता.भोर),चंद्रकांत तुकाराम चंदनशिव (वय ५२ रा. किवत ता.भोर), मारुती धोंडीबा झुनगारे (वय ५२ रा. सांगवीभिडे ता.भोर) हे जखमी झाले आहेत दोघेजण गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे. याबाबत मिळालेली महिती अशी कि आज सकाळी १० वाजता भोर-स्वारगेट हि साधी एस.टी.बस भोर एस.टी स्टॉडवरुन चालक एस.एस.बळी हा घेऊन निघाला गाडीत ३० प्रवासी होते.एस.टी बस सांगवी गाव आणी निरादेवघर कॉलनी यांच्या मधील उतारावरील रस्त्यावर गाडी आल्यावर एका लहान वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने गाडी बाजुच्या गटारात जाऊन पलटी झाली.यात ६ प्रवासी जखमी झाले.यातील दोघांना मोठया प्रमाणात हाडांची मोडतोड झाल्याने पुण्याला हलविण्यात आले आहे. अपघाताची महिती मिळताच प्रमोद रवळेकर,रविंद्र वीर,अक्षय दामगुडे सचिन देशमुख,संजय खरमरे,स्वाती मेढेकर,मयुर कांबळे उमेश हौसुरकर,रोहत गायकवाड सांगवी गावातील ग्रामस्थांनी व सहयाद्री रेसक्यु फोर्सने गाडीच्या काचा फोडुन प्रवाशांना बाहेर काढले आणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.अपघातानंतर भोर पोलीस आणि एस.टीचे अधिकारी कर्मचारी हजर झाले. .............
३० प्रवासी घेऊन जाणा-या एसटी बसचा चालक हा दारु पिऊन निष्काळजीपणे गाडी चालवत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.रस्त्याच्या जवळ गटारात गाडी पलटी झाली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पुढे अर्धा किलोमीटरवर निरानदीच्या पुलावर घटना घडली असती तर मोठा अर्नथ झाला असता अपघातानंतर चालक फरार झाला आहे.त्यामुळे त्याच्यावरचा संशय अधिकच बळावला आहे.