पुणे: दिवाळीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने गर्दीच्या काळात एसटी महामंडळाकडून दिवाळी हंगाम काळासाठी तिकीट दरात सर्वच मार्गांतील गाडीवर १० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या प्रवासासाठी सुमारे ५० रुपये, तर १०० ते १५० रुपये लांबपल्ल्याच्या गाड्यांना जादा भाडे द्यावे लागणार आहे. ही दरवाढ मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू हाेणार आहे. ८ ते २७ नोव्हेंबर या काळात परिवर्तनशील भाडे आकारणी केली आहे. यामध्ये साधी, जलद, निमआराम, शिवशाही या गाड्यांसाठी दरवाढ करण्यात आली आहे, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.
बसचे नियमित भाडेप्रवास - शिवनेरी - शिवशाही - साधी बस (रुपये भाडे)
पुणे - नागपूर - २४०५ - १६०५ - १०८०पुणे - नांदेड - १५५०- १०३५ - ६९५
पुणे - बीड - ८५५ - ५७० - ३८५पुणे - सोलापूर - ८३५ - ५५५ - ३७५
पुणे - कोल्हापूर - ७७५ - ५२० - ३३०पुणे - मुंबई - ५२५ - ३५० - २३५
पुणे - छत्रपती संभाजीनगर - ७५५ - ५०५ - ४६५दिवाळीतील भाडेवाढ
प्रवास - शिवनेरी - शिवशाही - साधी बसपुणे - छत्रपती संभाजीनगर - ७५५ - ५५५ - ३७५
पुणे - मुंबई - ५२५ - ३८५ - २६०पुणे - कोल्हापूर - ७७५ - ५७० - ३८५
पुणे - नागपूर - २४०५ - १७७० - ११९०पुणे - नांदेड - १५५० - ११४० - ७७०
पुणे - बीड - ८५५ - ६३० - ४२५पुणे - सोलापूर - ८३५ - ६१५ - ४२५
सध्या सर्वच गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले असल्याने खासगी बसला जादा भाडे द्यावे लागते. एसटीचा प्रवास स्वस्त आणि सुरक्षित म्हणून प्रवास केला जातो. मात्र त्याच्या भाड्यात दरवाढ झाल्याने भाडे परवडत नाही. त्यात पुणे ते नागपूरला अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. - प्रभू शिंदे, प्रवासी