लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना टाळेबंदी संपली, मोठ्या गाड्या सुरूही झाल्या, विद्यार्थ्यांच्या गाड्यांना मात्र अद्याप मागणी नसल्याने एसटी महामंडळाच्या पुणे विभागाला मासिक १ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो आहे.
कोरोना टाळेबंदीत सर्वच गाड्या बंद होत्या. त्यानंतर सरकारने हळूहळू परवानगी दिली. आता पुणे जिल्ह्यातून राज्यातील सर्व जिल्ह्यांत गाड्या जातात येतात. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्याºगाड्या मात्र अद्याप मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या नाही. तालुक्यांमधील गावांमधून शाळा, महाविद्यालये असणाऱ्याºठिकाणी या गाड्या जात येत असतात.
अशा गाड्यांची पुणे जिल्ह्यांची संख्या २१३ इतकी होती. ३१ हजार ६५ विद्यार्थी दरमहा या गाड्यांसाठी प्रवासी पास घेत होते. त्यातून मंडळाला दरमहा ३ कोटी रुपये मिळत होते. सरकार शाळा, महाविद्यालयांना परवानगी देतच नसल्याने या सर्वच गाड्या बंद होत्या. नुकताच सरकारने शाळा व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतरही विद्यार्थ्यांसाठीच्या गाड्यांच्या संख्येत फारसा फरक पडलेला नाही.
सुरुवातीच्या २१३ गाड्यांपैकी फक्त १३० गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. ७३ गाड्यांची मागणीच झालेली नाही. सुरू झालेल्या गाड्याही मंडळाला तोट्यातच चालवाव्या लागत आहेत. प्रवासी पास काढणाऱ्याºविद्यार्थ्यांची संख्या तर फक्त ३ हजार ९०० इतकीच आहे. यामुळे मंडळाला दरमहा १ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.
अन्य ठिकाणी जाणाऱ्याºगाड्या मात्र १०० टक्के सुरू झाल्या आहेत. एकही गाडी बंद झालेली नाही. पुण्यातील महामंडळाच्या सर्व आगारांमधून तसेच तालुका आगारांमधूनही सर्व ठिकाणच्या गाड्या व फेऱ्याही १०० टक्के सुरू झाल्या आहेत. त्यात काहीही फरक पडलेला नाही, अशी माहिती महामंडळाचे पुणे विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणावरे यांनी दिली. विद्यार्थ्यांसाठीच्या गाड्यांची संख्याही शाळा, महाविद्यालये नियमित सुरू झाल्यानंतर वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
टाळेबंदीआधीचे पासधारक विद्यार्थी- ३१ हजार ६५
टाळेबंदीनंतरचे पासधारक विद्यार्थी- ३ हजार ९००
विद्यार्थ्यांसाठीच्या गाड्यांची आधीची संख्या- २१३
टाळेबंदीनंतरची संख्या- १३०
एसटी महामंडळाचे आधीचे दरमहा उत्पन्न-३ कोटी
टाळेबंदीनंतरचा दरमहा तोटा - १ कोटी
शाळा, महाविद्यालये अजून नियमित सुरू झालेले नाहीत, त्यामुळे पास काढलेला नाही. विद्यार्थ्यांसाठी गाडी आवश्यकच आहे.
सचिन लेंडवे