वाघाळे : शिरुर तालुक्यातील वाघाळे येथे समोरुन आलेल्या एस.टी.बसची डोळ्यावर लाईट पडल्याने बोलेरोमधील काही अज्ञात युवकांनी बसमधील चालक,प्रवाशांसह भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मंडलाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना येथे घडला. याबाबत एसटी बसचे वाहक बाबुराव नामदेव फराटे (रा.करंदी ता.पारनेर जि.अहमदनगर) यांनी रांजणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. सोमवार (दि.१४ मे ) रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास फराटे हे पुणे पारगाव ही बस ( एम.एच.१२ इ.एफ.६७८० ) घेऊन वाघाळेहून मलठणच्या दिशेने चाललेले असताना बोलेरो (एम.एच.१६ ए.जे.३५७७) या वाहनातील अज्ञात तरुणांनी डोळ्यावर लाईट पडल्याच्या कारणाने फराटे यांच्यासह बस मधील प्रवाशांना शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण केली.त्याच बरोबर ही चाललेली भांडणे सोडवण्यासाठी थांबलेल्या मंडलाधिकारी टी.एम.गिरीगोसावी यांनाही मारहाण केली असल्याचे फराटे यांनी फिर्यादीत नमुद केले आहे. या प्रकरणी वाघाळे येथील अज्ञात तरुणांवर शिवीगाळ , मारहाण व दमदाटी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर तालुक्यात अज्ञातांची एसटी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 6:30 PM
डोळ्यावर प्रकाश पडल्याच्या कारणाने युवकांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना शिरूर येथे घडली.
ठळक मुद्देयाप्रकरणी वाघाळे येथील अज्ञात तरुणांवर शिवीगाळ , मारहाण व दमदाटी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल