पुणे: राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा. या तसेच इतर अनेक प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. एसटी कामगार संघटना आणि राज्य सरकार यांच्यात बोलणी सुरू आहे. मात्र, त्याचा सर्वाधिक फटका पुणे, मंबईतून दिवाळीनिमित्त गावाकडे गेलेला नागरिकांना बसत आहे. सोमवार (दि.८) पासून पुन्हा ते मुंबई-पुण्याकडे परतू लागले आहेत. मात्र, खासगी कॅब, ट्रॅव्हल्सने सर्वसामान्य प्रवाशंची लूट सुरू केली आहे.
एसटी गाड्यांचे मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद उस्मानाबाद, बीड, लातूरसाठी साधरण २०० ते ५०० रूपयांच्या दरमान्य भाडे आहे. मात्र, संपामुळे प्रवाशांना आपआपल्या गावावरून पुणे, मुंबईकडे येण्यासाठी अक्षरश: लूट सुरू झाली आहे. खासगी ट्रॅव्हल्स, कॅब वाल्यांनी याचा गैरफायदा घेत गाडीभाड्यात तिप्पट-चौपट दर केले आहे.
खासगी ट्रॅव्हल्सचे वाढीव दर
शिवाजीनगर ते अमरावती १५०० रूपयेपुणे ते उस्मानाबाद ११०० रूपयेपुणे ते लातूर १२०० रूपयेपुणे ते बीड १००० रूपयेपुणे ते वर्धा १२०० रूपयेपुणे ते नाशिक ५०० ते ६०० रूपयेपुणे ते नागपूर १५०० ते १८०० रूपयेपुणे ते औरंगाबाद ७०० रूपयेपुणे ते मुंबई ६०० ते ७००
पुण्यात दिवसभर वाहतूक सुरूळीत
राज्यभरातील अनेक एसटी डेपो संपामुळे बंद करण्यात आले होते. तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यातील नारायणगाव आणि खेड (राजगुरूनगर) वगळता अन्य सर्व आगारामधून नियमितपणे गाड्या सुरू होत्या. बाहेरूनही अनेक गाड्या प्रवाशांनी भरून येत होत्या. तर पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारातून नियमित तसेच सुरळीतपणे सुरू होती.