पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी मंगळवारी पुण्यातील प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी व चालक-वाहकांशी संवाद साधला. एसटीचे उत्पन्न व प्रवासी वाढीसह त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. चन्ने यांनी पुणे विभागीय कार्यालयासह शिवाजीनगर आगार व मेट्रो प्रकल्पाचीही पाहणी केली. यावेळी विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बस, बसस्थानक स्वच्छतागृह आदींबाबत प्रवाशांनी विभागाच्या demsrtcpune@gmail.com आणि meopune@rediffmail.com या ई-मेलवर सुचना पाठविण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.
एसटीच्या उपाध्यक्षांचा प्रवाशांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 4:20 AM