पुणे : मुद्रांक व नोंदणी फी परतावा मिळण्यासाठी नागरिकांना नोंदणी व मुद्रांक विभागाकडे सातत्याने हेलपाटे मारावे लागतात. तसेच, यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी येत्या ३० डिसेंबरपासून संपूर्ण राज्यात मुद्रांक व नोंदणी फी परतावा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने मिळणार असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी दिली. नोंदणी व मुद्रांक विभागाने मुद्रांक व नोंदणी फी परतावा प्रकरणांच्या नोंदीसाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन परतावा प्रणालीचा वापर केला जाणार आहे. सदर प्रणाली अर्जदारांकरिता विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जदारांनी न्यायिकेतर मुद्रांकाचा किंवा दस्तनोंदणीसाठी शासनास भरलेल्या तथापि दस्तनोंदणी न केलेल्या नोंदणी फीचा परतावा मागणीसाठी अर्ज करण्यापूर्वी या प्रकरणालीमध्ये डाटा एंट्री करणे आवश्यक आहे.ही डाटा एंट्री करणे म्हणजे परताव्यासाठी अर्ज करणे असा अर्थ नसून डाटा एंट्री केल्यानंतर, संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित मुद्रांकासह अर्जावर रिफंट कोड नमूद करून परताव्यासाठीच्या विहित मुदतीत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.तसेच, या प्रणालीच्या वापरासंदर्भात आवश्यक असलेले प्रशिक्षण संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. ......प्रकरणांची घरबसल्या माहिती मिळणारऑनलाईन परतावा प्रणालीमुळे परतावा प्रकरणांवर कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी कमी होणार असल्याचे कवडे यांनी स्पष्ट केले. पक्षकाराला परतावा प्रकरण कोणत्या टप्प्यावर आहे किंवा कोणत्या कारणामुळे प्रलंबित आहे, हे पोर्टलवर घरबसल्या समजेल. या संदर्भातील एसएमएस त्याला येईल. तसेच परतावा आदेश व इतर पत्रव्यवहार डाऊनलोड करता येईल. ऑनलाईन परतावा प्रणालीमुळे कामकाजात पारदर्शकता निर्माण होणार आहे. या प्रणालीच्या वापरात अडचण असल्यास सारथी हेल्पलाईन क्रमांक ८८८८००७७७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कवडे यांनी केले आहे.
मुद्रांक व नोंदणी फी परतावा मिळणार आता ऑनलाईन : अनिल कवडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 11:59 AM
नागरिकांच्या सोयीसाठी व पारदर्शक कारभारासाठी निर्णय
ठळक मुद्देप्रकरणांची घरबसल्या माहिती मिळणारसंबंधित कर्मचाऱ्यांना प्रणालीच्या वापरासंदर्भात आवश्यक असलेले प्रशिक्षण संबंधित मुद्रांकासह परताव्यासाठीच्या विहित मुदतीत अर्ज दाखल करणे आवश्यक