शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
3
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
4
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
5
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
6
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
7
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
8
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
9
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
10
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
11
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
12
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
14
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
15
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
16
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
17
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
18
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
19
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
20
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार

राजू शेट्टींच्या विरोधात भूमिका; रविकांत तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हकालपट्टी

By भाग्यश्री गिलडा | Published: July 22, 2024 4:34 PM

रविकांत तुपकर यांची स्वतंत्र सुरुवात ही राजकारणाची वेगळी किनार दाखवणारी दाखवणारी वाटते, संघटनेचे पदाधिकारी

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा (Swabimani Shetkari Sanghatna) प्रमुख आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. याप्रकरणी निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून समिती नेमण्यात आली होती. त्या समितीच्या सदस्यांनी घेतलेलय निर्णयानुसार रविकांत तुपकर यांच्याशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा काहीही संबंध नाही असा निर्णय जाहीर सोमवारी (दि. २२) पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सतीश काकडे, घनशाम चौधरी, विठ्ठ्ल मोरे, अमरसिंह कदम, अनिल पवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या विरोधात आरोप करणारे रविकांत तुपकर यांनी २०१९ ची विधानसभा तोंडावर असताना संघटना सोडून गेले ते का गेले याचे उत्तर आम्हाला मिळाले नाही. पण एक महिन्याचा कालावधी गेल्यानंतर परत ते संघटनेमध्ये आले. तेव्हा संघटनेमध्ये प्रवेश घेताना तुम्हाला पद दिले जाणार नाही, एक सामान्य कार्यकर्त्यासारखे काही दिवस तुम्हाला काम करावे लागेल. या अटीवर संघटनेने त्यांना परत घेतले. त्यानंतर ते संघटनेच्या बैठकींना, ऊस परिषदांना उपस्थित राहिलेले नाही. वारंवार त्यांना सूचना देऊन सुद्धा त्यांनी मौन बाळगणे स्वीकारले.

संघटनेने चार वर्षे वाट पाहिली मात्र आता वाट पाहू शकत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा आजपासून रविकांत तुपकर यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही ते संबंध संघटनेने तुमच्यासोबत संपलेले आहेत. तसेच मी चळवळीमध्ये आहे असं म्हणतात आणि संघटनेच्या नेतृत्वावर सातत्याने प्रसार मीडियातून आघात करत असताना बघायला मिळाले. तसेच अलीकडे ते स्वाभिमानी संघटना ही माझी संघटना आहे असा संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही काकडे यांनी केला आहे.

दोघांनाही एकमेकांची गरज

लोकसभेच्या निवडणुकीत राजू शेट्टी यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. तसेच, बुलडाण्यात रविकांत तुपकर यांचाही पराभव झाला आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी साथ सोडल्यानंतर संघटनेची ताकद नाही म्हटले तरी कमी झाली आहे. तुपकर यांनाही संघटनेची गरज आहे. तसेच, राजू शेट्टी यांना संघटनेत तुपकर यांच्यासारखा आक्रमक चेहऱ्याची गरज आहे असेही सतीश काकडे म्हणाले.

राजकारण न कळण्याइतके आम्ही वेडे नाही...

तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये जर असाल तर मग मात्र या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या सल्ल्याने तुम्हाला जावं लागेल तुमची स्वतंत्र सुरुवात ही राजकारणाची वेगळी किनार दाखवणारा आम्हाला वाटतो आहे. त्यामुळे तुमचे राजकारण न कळण्याइतके आम्ही वेडे नाही असे वक्तव्य काकडे यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत Ravikant Tupkarरविकांत तुपकर