शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

स्मार्ट सिटीच्या जाहिरात धोरणाला स्थायी समितीची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 2:27 AM

महापालिकेला वर्षाला ६० कोटींचे उत्पन्न मिळणार : स्मार्ट सिटीला मिळणार एकूण उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम

पुणे : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या समन्वयाने शहरातील जाहिरात धोरण राबविण्यास सोमवारी (दि. १७) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, अशी माहिती समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.

शहरातील जाहिरात धोरण राबविण्याबाबतचा प्रस्ताव पुणेस्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने महापालिकेला दिला आहे. महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून शहर हदीमध्ये एकूण १८८६ जाहिरात फलकांना परवानगी दिलेली आहे. त्यापोटी प्रति चौरस फूट २२२ रुपये प्रमाणे जाहिरात फलक, नामफलक व ताब्यात असलेले दिशादर्शकमुळे अंदाजे तीस कोटी इतके वार्षिक उत्पन्न मिळते. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील अंदाजे १ हजार १५० बस शेल्टर्स १२० जाहिरात फलक, सर्व बसवरील जाहिरातीपोटी व इतर सर्व जाहिरात निविदा प्रक्रियेतून वार्षिक १० कोटी उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. आता या बाबतची निविदा प्रक्रिया राबविणार आहे. त्यासाठी प्रति चौरस फूट २२२ रुपये शुल्क घेण्यात येणार आहे.स्मार्ट सिटीच्या जाहिरात धोरणात परवानगी दिलेले १ हजार ८८६ जाहिरात फलक, शासकीय जागा, दिशादर्शक कमानी, सार्वजनिक स्वच्छतागृह, पीएमपीच्या बस, शेल्टर्स याचा समावेश आहे. या निविदेमधून मिळणाऱ्या उत्पन्नातील ७५ टक्के रक्कम महापालिकेला तर २५ टक्के रक्कम पीएमपीला देण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीला निविदा रकमेच्या दोन टक्के रक्कम दिली जाणार आहे.नवीन जाहिरात फलकासाठी झोननिहाय परवानगी देण्यात येणार आहे. स्ट्रीट फर्निचर अंतर्गत युनिपोल, गॅट्री, विघृत पोल, नवीन पुल, पादचारी पूल यांचा समावेश असणार आहे.महापालिकेच्या मालकीचे असलेले सर्व जाहिरात फलक, दिशादर्शक कमानी या कालावधीत संपुष्टात आल्यानंतर त्या स्मार्ट सिटी कंपनीकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (पीएमपी) जाहिरातीचांही यामध्ये समावेश असणार आहे. त्यात सर्व बसस्थानक, पीएमपीच्या सर्व जागेवरील जाहिरात फलकांचा समावेश असणार आहे. याबाबतचा व्हेंडर निश्चित झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत सर्व अनधिकृत जाहिरात फलक महापालिका काढून टाकणार आहे.या निविदेचा कालावधी १५ वर्षांपर्यंत असणार आहे. त्यापुढे कामाची गुणवत्ता तपासून पुढील पाच वर्षांसाठी सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्यात येईल. त्यानंतरहोर्डिंगवरील ताबा महापालिकेचा राहणार आहे.जाहिरात शुल्कामध्ये दर तीन वर्षांनी पाच टक्के वाढ केली जाणार आहे, असे प्रस्तावामध्ये स्पष्ट करण्यात आल्याचे मुळीक यांनी सांगितले.असे असेल नवीन जाहिरात धोरण४जाहिरात धोरण जाहीर झाल्यानंतर तीन महिन्यांत सर्व अनधिकृत फलक काढणार४फलक न काढणाºयांवर जप्तीची कारवाई करणार४शासकीय, खासगी ठिकाणी स्टिकर्स, बिल, पोस्टर्स लावल्यास दंड आकारणी व कारवाई४समाविष्ट होणाºया हद्दीस नियम लागू४महापालिकेच्या मालकीचे जाहिरात फलक करार संपल्यानंतर स्मार्ट सिटीकडे४तात्पुरत्या स्वरुपात लावण्यात येणाºया राजकीय जाहिरात फलकांकरिता १०० जागा 

टॅग्स :PuneपुणेSmart Cityस्मार्ट सिटी