पुण्यात हाेणार हाय व्हाेल्टेज प्रचार ; स्टार प्रचारक घेणार सभा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 08:31 PM2019-04-15T20:31:36+5:302019-04-19T15:45:10+5:30

पुण्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आता अवघ्या पाच ते सहा दिवसांवर राहिलेली असताना सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक पुण्यात हजेरी लावण्याची शक्यता आहे.

star campaigner will come to pune for election sabha | पुण्यात हाेणार हाय व्हाेल्टेज प्रचार ; स्टार प्रचारक घेणार सभा

पुण्यात हाेणार हाय व्हाेल्टेज प्रचार ; स्टार प्रचारक घेणार सभा

Next

पुणे : पुण्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आता अवघ्या पाच ते सहा दिवसांवर राहिलेली असताना सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक पुण्यात हजेरी लावण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबराेबरच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, काॅंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद शर्मा, नवज्याेतसिंग सिद्धू, शत्रुघ्न सिन्हा, केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गाेयल, महिला आणि समाजकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याबराेबरच काॅंग्रेसमध्ये गेलेले शत्रुघ्न सिन्हा, माजी क्रिकेटर महंमद अझरुद्दीन हे सगळे पुण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्याकाळात आराेप प्रत्याराेपांच्या फैरी पाहायला मिळणार आहेत. 

पुण्याच्या लाेकसभेच्या जागेला जास्त महत्त्व आहे. युतीकडून गिरीश बापट हे रिंगणात आहेत तर आघाडीकडून माेहन जाेशी निवडणूक लढवत आहेत. दाेन्ही उमेदवारांकडून जाेरदार प्रचार सुरु आहे. पुण्याचे मतदान 23 एप्रिलला हाेणार असून रविवारी (21 एप्रिल) संध्याकाळी पाच वाचता प्रचार संपणार आहे. शेवटचे अवघे काही दिवस राहिले असल्याने सगळेच पक्ष जाेरदार प्रचार करत आहेत. मुख्यमंत्री काेथरुडमध्ये सभा घेणार आहेत. याआधी त्यांच्या पुण्यात दाेन सभा झाल्या हाेत्या. गडकरी, मुंडेही सभा घेणार आहेत. दुसरीकडे शरद पवार राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. पुण्यातही शेवटच्या टप्प्यात ते सभा घेण्याची शक्यता आहे. 

राज ठाकरेंची ताेफ धडाडणार 
बारामती लाेकसभा मतदार संघात खडकवासला मतदार संघ येताे. तेथे राज ठाकरे सभा घेणार आहेत. खडकवासला पुणे शहरापासून जवळ असल्याने पुणेकरांचे देखील या सभेकडे लक्ष लागले आहे. सध्या राज ठाकरे राज्यात विविध ठिकाणी सभा घेत असून भाजपावर कडाडून टीका करत आहेत. 

Web Title: star campaigner will come to pune for election sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.